‘दिवाळी संपली .. अल्फा सुरू ! - शर्वरीची मंडे मोटिवेशन पोस्ट, इंटेन्स बारबेल रो वर्कआउट करत दाखवला जलवा!
बॉलीवूडची हिट-गर्ल शर्वरीसाठी हे वर्ष नक्कीच खास ठरलं आहे. तिने 100 कोटींची ब्लॉकबस्टर ‘मुँज्या,’ ग्लोबल स्ट्रीमिंग हिट ‘महाराज’ आणि हाय-ऑक्टेन थ्रिलर ‘वेदा’मध्ये उल्लेखनीय अभिनय सादर केला आहे.
दिवाळीच्या उत्सवांनंतर आता शर्वरी पुन्हा कामात रमली आहे आणि आपल्या आगामी वायआरएफ स्पाय युनिव्हर्स चित्रपट ‘अल्फा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. सोशल मीडियावर तिने मंडे मोटिवेशन देणारी पोस्ट शेअर केली आहे, ज्यात ती जिममध्ये बारबेल रो वर्कआउट करताना आपली फिट बॉडी फ्लाँट करत आहे.
येथे पोस्ट पहा: https://www.instagram.com/p/DCOBvYWtICD/?igsh=MTFkZGRhN2FrYmVoNA==
शर्वरीने आपल्या फिटनेस फोटोला कॅप्शन दिले, “दिवाळी संपली, अल्फा सुरू 💣💥 #MondayMotivation"
अल्फाच्या शूटमुळे शर्वरी सध्या आपल्या फिटनेसच्या शिखरावर आहे. ‘अल्फा’मध्ये ती आलिया भट्टच्या समवेत दिसणार असून, हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘द रेलवे मॅन’ फेम शिव रवैल यांनी केले आहे.