Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'कॉमनमॅन'च्या भावना उमटल्या 'रॅप'मधून*

*'कॉमनमॅन'च्या भावना उमटल्या 'रॅप'मधून*



*पटाखा फिल्म्सची निर्मिती*



निवडणूक आली की वातावरण बदलून जातं. आश्वासनांची, घोषणांची खैरात केली जाते. एरवी  सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या असणारा मतदारवर्ग निवडणूक आल्यावर मात्र एकदम प्रकाशझोतात येतो. राज्यात आता निवडणुकीची धामधूम असताना  कॉमनमॅनच्या भावनांना साजेसे असे एक रॅप नुकतेच सोशल मीडियावर आले असून या रॅपला तरुणाईचा कमालीचा प्रतिसाद मिळत आहे.



पटाखा फिल्म्सच्या आरती साळगावकर, सुहास साळगावकर यांनी कॉमनमॅन या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. राकेश शिर्के यांनी लिहिलेलं रॅप गाणं प्रफुल्ल स्वप्नील यांनी संगीतबद्ध केलं आहे. वरूण लिखते यांनी रॅप गायलं आहे. रॅप हा गीतप्रकार विद्रोही म्हणून ओळखला जातो. राजकारण, निवडणुकीत सर्वसामान्यांचं काय होतं याचं वास्तव या रॅपमधून मांडण्यात आलं आहे.



निवडणुकीच्या धामधुमीत नवनवी प्रचार गीतं येत असताना सर्वसामान्यांच्या भावना मांडण्याची तसदी फारशी कोणी घेतलेली दिसली नाही. ती उणीव या  कॉमनमॅननं नक्कीच भरून काढली आहे. राजकीय पक्ष त्यांना साजेशा अशा अनेक गोष्टी करतात. मात्र सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यापासून ते अगदी रस्त्यावरील खड्यांपर्यंत अनेक प्रश्नांना दररोज तोंड द्यावं लागतं. वर्षांनुवर्षं वाट पाहूनही या समस्या मात्र  काही सुटत नाही. केवळ शांत राहून घडणाऱ्या घडामोडी बातम्यांतून पाहत बसण्याची वेळ मात्र या कॉमनमॅनवर येते, हे सूत्रसमोर ठेवूनच हे कॉमनमॅनचं रॅप करण्यात आलं आहे.



*Link*


https://youtu.be/rksO_5fv8K4




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.