आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!
October 03, 2024
0
आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!
यशराज फिल्म्सने घोषणा केली आहे की त्यांचा बहुप्रतीक्षित अॅक्शन एंटरटेनर अल्फा, जो YRF स्पाय युनिव्हर्समधील पहिली महिला-प्रधान चित्रपट आहे, २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत.
बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट्ट या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत, तर त्यांच्या सोबत YRFची होमग्रोन टॅलेंट आणि उभरती स्टार शर्वरीही असणार आहे. दोघीही या बहुप्रतीक्षित स्पायवर्स चित्रपटात सुपर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत, ज्याचे दिग्दर्शन शिव रवैल करत आहेत.
अल्फा हा सणांच्या काळातील एक परिपूर्ण मनोरंजन ठरणार आहे, आणि आदित्य चोप्रा या चित्रपटाला भव्य स्वरुप देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. या चित्रपटात नेत्रदीपक दृश्य आणि रोमांचक अॅक्शन सीक्वेन्ससह अनेक अनपेक्षित ट्विस्ट्सही असणार आहेत.
Instagram Link - https://www.instagram.com/p/DAsMaJUoJRx/?igsh=c20wemowcGppbDFu