Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मराठमोळ्या swag मध्ये 'नाकात नथ' गाण्याची रसिकांना भुरळ*

*मराठमोळ्या swag मध्ये 'नाकात नथ' गाण्याची रसिकांना भुरळ* *नखरेल अंदाजाने घायाळ करणारी मानसी नाईक आणि आदित्य घरत ही फ्रेश जोडी 'नाकात नथ' गाण्यातून भेटीस* *'नाकात नथ' गाण्यातील मानसी नाईकच्या लूकची चर्चा, आदित्य घरतबरोबरच्या या गाण्यातून प्रेक्षकांना लावलं वेड*
नाकातील नथीने अर्थात तरुणीच्या सौंदर्यात भर पडते. नथीचा नखरा ही थीमदेखील विशेष चर्चेत राहिली, यानंतर आता पुन्हा नाकातील नथीची भुरळ घालायला एका रोमँटिक, बहारदार गाण्याची भर पडली आहे, हे गाणं म्हणजे 'नाकात नथ'. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या नाकात नथ या गाण्याने प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकविला आहे. साऱ्यांना भुरळ घालणाऱ्या या गाण्यातून एक नवी कोरी जोडीही त्यांचा नखरा दाखवताना दिसत आहे. ही जोडी म्हणजे अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता आदित्य घरत. या बेधुंद आणि धमाकेदार गाण्यातून मानसी नाईकचा नखरेल अंदाज विशेष भावतोय. यापूर्वीच्या तिच्या सर्वच गाण्यांनी रसिकांना थिरकायला भाग पाडलं आता यानंतरही तिचं आलेलं हे मराठमोळं नाकात नथ हे गाणं साऱ्यांच्या दिलावर राज्य करतंय. गायक रोहित राऊत व गायिका सोनाली सोनावणे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केलेल्या या गाण्याला मानसी व आदित्यने चार चाँद लावले आहेत.
या गाण्याच्या दिग्दर्शनाची व स्क्रीनप्लेची दुहेरी धुरा मनीष महाजन यांनी सांभाळली असून संगीताची जबाबदारी आर.तिरुमल यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. मानसी व आदित्य यांचं नखरेल swag असलेलं हे नाकात नथ गाणं साऱ्यांना ठेका धरायला लावतंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.