Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

IMDb द्वारे आजवरच्या सर्वोत्तम 250 भारतीय चित्रपटांची नावे जाहीर

IMDb द्वारे आजवरच्या सर्वोत्तम 250 भारतीय चित्रपटांची नावे जाहीर मूव्हीज, टीव्ही‌शोज व सेलिब्रिटीजवरील जगातील सर्वांत लोकप्रिय व विश्वसनीय माहितीचा स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) च्या ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झालेल्या भारतीय इन्स्टाग्राम हँडलचे फॉलोअर्स 250,000 झाले आहेत. देशभरातील चाहते काय ट्रेंडिंअमध्ये आहे, नवीन कंटेंट कोणाते आहे हे शोधण्यासाठी व काय बघावे व कुठे बघावे हे ठरवण्यासाठी IMDb इंडियाच्या सोशल मीडिया हँडल्सवर अवलंबून असतात. ह्या माईलस्टोन साजरा करण्यासाठी IMDb एक मर्यादित आवृत्तीचे कलेक्टीबल पोस्टर सादर करत आहे व त्यामध्ये आजवरच्या सर्वोत्तम रेटींग असलेल्या टॉप 250 भारतीय चित्रपटांची नावे असतील व हे पोस्टर मनोरंजन उद्योगातील आघाडीच्या लीडर्सना एक भेटवस्तू म्हणून दिले जाईल. तसेच, IMDb इंडिया इन्स्टाग्रामवर एक स्पर्धा आयोजित करेल व त्यामुळे निवडक चाहत्यांना हे आकर्षक पोस्टर जिंकण्याची संधी मिळेल. ह्या स्पर्धेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठीIMDb इंडिया इन्स्टाग्राम वर आत्ताच जा. IMDb टॉप 250 सर्वोच्च रेटिंग असलेल्या भारतीय चित्रपटांची यादी हे सर्वाधिक रेटिंग असलेल्या भारतीय चित्रपटांचे दालन आहे व त्याद्वारे चाहत्यांना सर्वोत्तम दर्जाच्या नवीन चित्रपटांबरोबर सर्व दशकांमधील व विविध प्रकार व प्रदेशांमधील उत्कृष्ट अशा चित्रपटांचा शोध घेता येईल. ह्या विशेष यादीमधील शीर्षके ही IMDb वर नियमित प्रकारे वोट करणार्‍या IMDb युजर्सनी दिलेल्या रेटींग्जनुसार निर्धारित करण्यात आली आहेत. उल्लेखनीय आहे की, सध्या ह्या यादीमध्ये क्रमांक 1 वर असलेला चित्रपट 2023 चा व समीक्षकांनी उचलून धरलेला 12th फेल हा आहे. महाराजा, कांतारा, आणि लापता लेडीज सारख्या आजच्या काळातील हिटसच्या बरोबर त्यानध्ये जाने भी‌ दो यारों, पेरीयेरुम पेरुमल, आणि पथेर पांचाली अशा अभिजात कलाकृतीसुद्धा आहेत व त्याद्वारे भारतीय चित्रपटांमधील वैविध्याचे दर्शन घडते. IMDb वर ह्या 250 चित्रपटांना एकत्रित 85 लाखांपेक्षा जास्त वोटस मिळाले आहेत.
22 सप्टेंबर 2024 च्या स्थितीनुसार ह्या यादीमधील टॉप 20 शीर्षके अशी आहेत: 12th फेल गोल माल नायकान महाराजा अपूर संसार अंबे सिवम पेरियेरुम पेरुमल 3 इडियटस #होम मेनिचित्रथाझू ब्लॅक फ्रायडे कुम्बलंगी नाईटस रॉकेटरी: द नंबी इफेक्ट 777 चार्ली किरीदम C/o कांचारापालेम तारें जमीं पर संदेशम दंगल लापता लेडीज उल्लेखनीय आहे की, 2024 मधील महाराजा, मैदान, द गोट लाईफ, लापता लेडीज आणि मंजुमेल बॉयज ही पाच शीर्षके ह्या यादीमध्ये आहेत. ह्या चित्रपटांमधील सर्वांत जुना चित्रपट हा 1955 मध्ये रिलीज झालेला सत्यजीत रे ह्यांची अभिजात कलाकृती असलेला पथेर पांचाली हा आहे. यादीमध्ये आहेत. ह्या चित्रपटांमधील सर्वांत जुना चित्रपट हा 1955 मध्ये रिलीज झालेला सत्यजीत रे ह्यांची अभिजात कलाकृती असलेला पथेर पांचाली हा आहे. सात शीर्षकांसह दिग्दर्शक मणि रत्नमचे ह्या यादीमध्ये सर्वाधिक चित्रपट आहेत व त्यानंतर सहा शीर्षके असलेल्या अनुराग कश्यप ह्यांचा क्रमांक येतो. विशेष म्हणजे, ह्या यादीमध्ये सीक्वेल्ससह सहा चित्रपट आहेत: दृश्यम 1 (मल्यालम) आणि दृश्यम 2 (मल्यालम), दृश्यम 1 (हिंदी) and दृश्यम 2 (हिंदी), मुन्नाभाई M.B.B.S. आणि लगे रहो मुन्नाभाई, जिगरथंडा आणि जिगारथंडा डबलेक्स, के. जी. एफ..: चॅपटर 1 आणि के. जी. एफ.: चॅपटर 2आणि बाहुबली: द बीगिनिंग आणि बाहुबली 2: द कन्क्लूजन. ह्या यादीमध्ये 12th फेल सर्वोच्च स्थानी आल्याचा आनंद व्यक्त करताना विक्रांत मेसीने ह्या चित्रपटातील सर्वाधिक भावपूर्ण प्रसंगाचा उल्लेख केला. त्याने म्हंटले, “मला जो प्रसंग सांगावासा वाटतो तो म्हणजे मनोज व त्याची आई ह्यांच्यामधील चंपीचा प्रसंग आहे व तो चित्रपटातील अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे मनोजला कळते की, त्याची आजी वारली‌ आहे. तो इतका विशेष बनला आहे, कारण एका एका शॉटच्या शूटींगसाठी भरपूर नियोजन व निर्मिती प्रक्रिया झाली होती. ह्या प्रसंगामध्ये पार्श्वभूमीमध्ये जादुचा प्रकाश येणारा दरवाजा आहे- दिवस व रात्र एकत्र येतात त्या संध्याकाळचा तो अवधी आहे व हा प्रकाश फक्त 5 ते 7 मिनिटे असतो. विधू विनोद चोपडा सर आणि डीओपी रंगराजन रामाबद्रन ह्यांनी खूप आधी ह्या मास्टर शूटचे नियोजन केले होते. सेटवर आम्हा कलाकारांना अतिशय अचूक काम करावे लागले, कारण तो प्रसंग चित्रीत करण्यासाठी आमच्याकडे अगदी थोडी मिनिटे होती. गीता जी आणि मी आम्ही ह्या भावनिक ओलावा असलेल्या प्रसंगासाठी ग्लिसरीन न वापरण्याचा निर्णय केला व शक्य तितक्या त्या क्षणाला अनुभवण्याचा प्रयत्न केला. इथे आम्हांला रडायचे नव्हते तर हुंदके व अश्रू येणे अपेक्षित होते. त्यामुळे हे एक मोठे आव्हान होते. त्यासाठी अनेक रिहर्सल्स लागल्या, परंतु नंतर आम्हांला ते करता आले.” सर्वोत्तम 250 सर्वाधिक रेटींग असलेल्या भारतीय चित्रपटांची यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा. मनोरंजनाचे चाहते IMDb इंडिया इन्स्टाग्राम हँडलला @IMDb_in इथे फॉलो करू शकतात व भारतीय चित्रपट, टिव्ही शोज व सेलिब्रिटीजबद्दल अपडेट माहिती घेऊ शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.