Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अभिजीतने दयाला का मारले? जाणून घेण्यासाठी बघा CID चे ट्रेलर!*

 *अभिजीतने दयाला का मारले? जाणून घेण्यासाठी बघा CID चे ट्रेलर!*

 

सगळ्यांचा आवडता CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोमांचक पुनरागमन करत आहे त्यामुळे दोन दशकांपेक्षा जास्त काळ ज्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले, ते कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही बातमी ऐकून प्रेक्षक आनंदले आहेत आणि आपल्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत करत असल्याबद्दल निर्मात्यांना धन्यवाद देत आहेत. पण या प्रोमोमध्ये एक अनपेक्षित आणि अविश्वसनीय खोच आहे. एके काळी जिवलग दोस्त असणारे अभिजीत आणि दया आता एकमेकांचे शत्रू झाले आहेत.


जे देशासाठी नेहमी एक होऊन लढले आहेत ते आज शत्रू बनून एकमेकांसमोर का उभे आहेत? अभिजीतने दयाला का मारले?

CID चे ट्रेलर बघा, आणि जाणून घ्या: https://www.instagram.com/p/DBl7F8jvI2t/?hl=en 



ACP प्रद्युमनची भूमिका करणारे शिवाजी साटम म्हणतात, “मालिकेच्या या आवृत्तीत दया-अभिजीत यांची जोडगोळी तुटली आहे आणि आता दोघे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. CID चा पायाच हलून गेला आहे. आणि ACP प्रद्युमनचे विश्व उलट-पालट होणार आहे. सहा वर्षांनी पुन्हा ACP प्रद्युमन म्हणून परत येणे स्वप्नवत वाटते आहे. या व्यक्तिरेखेला भरभरून प्रेम मिळाले आहे आणि आम्ही प्रेक्षकांना रहस्य आणि हृदयाची धडधड वाढवणाऱ्या नाट्याने भरलेली थरारक सफर घडवण्याची हमी देतो.”


CID लवकरच परत येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.