Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*स्वप्नांच्या शोधाचं 'गारुड' लवकरच उलगडणार मोठ्या पडद्यावर, २५ ऑक्टोबरपासून जवळच्या सिनेमागृहात*

*स्वप्नांच्या शोधाचं 'गारुड' लवकरच उलगडणार मोठ्या पडद्यावर, २५ ऑक्टोबरपासून जवळच्या सिनेमागृहात* *गूढ, रहस्यमयी वेशात स्वप्नांचा शोध घेणाऱ्या 'गारुड' चित्रपटाचं मोशन पोस्टर आलं समोर*
माणूस हा आयुष्यभर कशा ना कशाच्या शोधात असतो. बरेचदा हे शोध आपणच कल्पलेल्या जादुई स्वप्नांचे असतात तर काही आत्मशोधासाठी असतात. बरेचदा हे शोध साधे-सरळ, तर काही वेळा असामान्य, अगम्य असतात पण हे शोध सुरुचं असतात. असेच काहीसे एका रात्रीतील गुढ, शोध लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहेत. हो कारण स्वप्नांच्या शोधाच उलगडणारं रहस्य हे 'गारुड' या चित्रपटातून २५ ऑक्टोबरपासून मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होत आहे. स्वप्नांच्या दुनियेत वावरत असताना एखाद्या शोधात ही पात्रे कशी गुरफटत जातात, आणि शेवटी तो शोध ते घेऊ शकतात का?, याचे गुपित या गारुड या चित्रपटातून उलगडणार आहे. "अंधारल्या रातीचं गारुड, भिजलेल्या रातीचं गारुड", असं म्हणत काळोखातील प्रकाशाच्या शोधातील हे 'गारुड' चित्रपटाचे मोशन पोस्टर अधिकच उत्सुकता वाढवत आहे. 'किमयागार फिल्म्स', 'एल एल पी' आणि 'ड्रीमव्हीवर' निर्मित आणि 'सनशाईन स्टुडिओ' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तसेच सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोल चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोरम यांनी बाजू सांभाळली. तर दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित आहे. तर रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोरम यांनी संभाळली आहे.
चित्रपटाबाबत दिग्दर्शक प्रताप सोनाळे यांनी असं म्हटलं की,"हा एक काल्पनिक चित्रपट आहे. पण मग यात विशेष असे काय आहे तर याची हाताळणी. ही हाताळणी आपल्या आजच्या वास्तविकतेशी मिळतीजुळती आहे, यातील प्रत्येक गूढ पात्र इतर पात्रांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीतून उलगडत जातं. त्यातूनच त्यांच्या कथेच्या, त्यांच्या शोधाच्या आवृत्त्या सादर होतात, पण ते शोध प्रेक्षकांच्या समोर येतात एका रंजक, गूढ, रहस्यमयी वेशात. त्याचं 'गारूड' आपल्या संवेदनांवर पकड घेतंच पण आपल्या मेंदूवरही आणि एक वास्तवकथाच पाहील्याची अनुभूती मिळते", असं म्हणत त्यांनी सुंदर अशा रहस्यमय कथेची ओळख करुन दिली आहे. गारुड हा रहस्यमय चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.