Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सारंगच्या प्रोजलला काय असेल सावलीचं उत्तर ?*

*सारंगच्या प्रोजलला काय असेल सावलीचं उत्तर ?* *सावली- सारंगच्या नात्याची होणार का नवी सुरुवात ?*
'सावळ्याची जणू सावली' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत, प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, मेघा धाडे यांचा अभिनय प्रेक्षकांना भावत आहे. मालिकेत सध्या सारंगसाठी मुलगी शोधायची लगबग सुरु आहे. एकीकडे सारंग अस्मीला टाळत आहे. तर दुसरीकडे ताराच बिंग फुटणार याची कुणकुण आहे, तारा परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर आली पण सावली दुसऱ्या खोलीत अडकली आहे ज्यामुळे तारा टेंशन मध्ये आहे. पण सावली खोलीतून सुटका करून बाहेर पडते आणि परफॉर्मन्स सुरू करण्यासाठी ग्रीन रूममध्ये पोहचते. सारंगसाठी खास आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत अस्मी सौंदर्य स्पर्धा जिंकते. तिलोत्तमा आणि चंद्रकांत आनंदी आहेत. जगन्नाथ अस्मीची कुंडली बघून तिलोत्तमाला भेटायला तिला घरी बोलावतो. सारंग अस्मीला त्याच्या जोडीदारांकडून अपेक्षा सांगतो. सारंग, अस्मीला प्रपोज करायचे ठरवतो आणि तिला डेटसाठी घेऊन जातो. अचानक लाइट गेल्यामुळे सारंग अस्मी समजून, सावलीला प्रपोज करतो. *आता काय होईल जेव्हा सारंग, सावलीला प्रोपोज करेल? अस्मिचं सत्य सर्वांसमोर उघडीस येईल का? बघायला विसरू नका 'सावळ्याची जणू सावली' दररोज संध्या. ७ वा. फक्त झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.