*सन मराठी वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट*
'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मम्मीसाहेब पोलीस स्टेशनच्या आवारात महिलांचा मोर्चा नेत मंजूच्या तोंडाला काळ फासण्यासाठी मम्मीसाहेबांनी शाई आणली आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच मम्मीसाहेब म्हणाल्या, "ही कॉन्स्टेबल स्वतःच्या नवऱ्याला, सासूला अटक करते आणि हिचा साहेब हिला मेडल देतात थांबा आता मीच मेडल देते" मंजूच्या चेहऱ्यावर शाई फेकायला एक बाई पुढे होते. तेवढ्यात सत्याचा थांबा! असा आवाज येताच त्या बाईच्या हातात असलेली शाईची बॉटल मम्मीसाहेब यांच्या चेहऱ्यावर पडते.
आता मालिकेत यापुढे सत्या मंजूच्या बाजूने उभा राहणार का? मम्मीसाहेब मंजूला त्रास देण्यासाठी आणखी कोणता नवा डाव रचणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
*मंजूचा पुढील प्रवास पाहण्यासाठी बघत रहा 'कॉन्स्टेबल मंजू' सोम ते शनि रात्री ८ वाजता आपल्या सन मराठी वाहिनीवर.*