*"तो आता आमच्यात नाही पण, मला फटाके फोडायला त्यानीच शिकवले."- वल्लरी विराज*
October 20, 2024
0
*"तो आता आमच्यात नाही पण, मला फटाके फोडायला त्यानीच शिकवले."- वल्लरी विराज*
*"मी करंजी सारखी आहे"- वल्लरी विराज*
*‘नवरी मिळे हिटलरला’* मालिकेतील लीला म्हणजेच वल्लरी विराज हिने दिवाळीच्या तिच्या हृदयाच्या सर्वात जवळच्या त्या आठवणींना उजाळा दिला." दिवाळीची एक आठवण जी आजही माझ्या हृदयात ताज़ी आहे. ती म्हणजे माझ्या काकाची, लहानपणी काकांनी मला फटाके फोडायला शिकवले. आता तो आमच्यासोबत नाहीये. पण मला त्याची खूप आठवण येते खासकरून दिवाळी मध्ये. दिवाळीत फटाक्यांच्या खरेदीसाठी जाणे, गच्चीत ते काका सोबत फोडायला शिकणे या सगळ्यगोष्टी माझ्या मनात अजून ही तितक्याच ताज्या आहेत. जर फटाके आणि दिवाळीच्या पदार्थाशी तुलना माझ्याशी करायची असेल तर मला वाटतं मी फुलबाजी सारखी आहे कारण, *फुलबाजी* प्रत्येक फाटक्या सोबत रमते तिच्या मदतीनी फटाके पेटवायला मदत होते. तसंच माझं आहे मला सर्वांसोबत रमायला आवडत. सर्वांच्या आनंदात मिसळायला आवडत. जर कुठच्या फराळाच्या पदार्थासारखी आहे विचारलात तर मी *करंजी* सारखी आहे कारण बाहेरून जरीही मी कडक असली तरीही आतून मी मऊ स्वभावाची आहे."
'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १०:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.