*"माझ्या डोळ्यासमोर आली ती कालीमाता..." - पारूने सांगितला तो किस्सा*
October 04, 2024
0
*"माझ्या डोळ्यासमोर आली ती कालीमाता..." - पारूने सांगितला तो किस्सा*
पारूची भूमिका साकारत असेलली शरयू सोनावणे हिने नवरात्री निमित्त आपल्यात कोणत्या देवी रूपाची छबी दिसते हे सांगितले, " माझे बाबा पोलिस दलात असल्यामुळे आणि लहानपण पोलिस कॉलनीत गेल्यामुळे मी तशी लहानांपणापासून धीटच आहे. बाबा नेहमी सांगत आले आहेत की कधीही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. त्यांनी कधी मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही आणि त्यांच्या छत्रछायेत मी मोठी झाली आणि तो धाडसीपणाही माझ्यात आला. मला एक किस्सा सांगायला आवडेल. नवरात्री चालू आहेत कोणत्या देवी रूपाचे गुण मला स्वतः मध्ये दिसतात, तर माझ्या डोळ्यासमोर येते ती कालीमाता, कारण तिच जे रौद्र रूप असत तस माझं ही कधी कधी होतं आणि अर्थात प्रत्येक स्रीच केव्हांना केव्हा ते होतंच असावं. स्त्रियां तश्या समजुदार असतात पण काही गोष्टी अति प्रमाणात झाल्या तर त्यांचं रौद्र रूप बाहेर येतं माझं ही होतं असं. मी खूप वेळा शांतपणे गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करते पण जर ती परिस्थिती अंगाशी येतं असेल तर मी ती सहन करत नाही.
माझा मुळात स्वभाव आहे की कोणती गोष्ट नाही पटली तर मी पटकन तोंडावर बोलते. आपलं एकच आयुष्य आहे ते आपण स्वाभिमानाने जगावं. अश्या खूप परिस्थितीचा मला अनुभव आला आहे आणि त्या सगळ्यात जास्त त्रास मलाच झाला आहे. मला इथे एक किस्सा सांगावासा वाटतोय. मी डांस करत असल्यामुळे आई सोबत कधी उशिरा प्रवास व्हायचा, तर माझी आई नेहमी लाल मसाला आणि स्वसंरक्षणाचे साहित्य जवळ ठेवायची. कारण कधीही कठीण प्रसंग आला तर स्वतःची रक्षा आपण करू शकतो. मी एक अंदाजे दहा वर्षाची असेन आम्ही चर्चगेट रेल्वे स्थनाकावरून घरी म्हणजे अंधेरीला जात होतो. स्टेशनवर पुष्कळ जागा आणि गर्दी नसूनही एक माणूस जाणून बुजून मला धक्का मारून गेला. मी तशीच त्याच्या मागे गेले त्या माणसाच्या पाठीत बुक्के मारून त्याचे केस धरले. माझ्या आईला काही कळेना से झाले. जवळ पोलीस काका होते ते ही पळत आले. मी त्या माणसाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. लहानपणापासून शिकवले जाते कि गुड टच -बॅड टच तर कळून जातं जेव्हा अश्या घटना घडतात. माझं एकच सांगण आहे प्रत्येक स्त्रीला स्वतःची रक्षा करता यावी इतकं जागरूक राहील पाहिजे आणि स्वसंरक्षण शिकलं पाहिजे. या सगळ्यामुळे मी सामर्थ्यवान झाली आहे. प्रत्येक मुलीला मी हेच सांगेन स्वतःला त्रास होईल आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असा काही करू नका. पण जर कुठे काही चुकत असेल तर स्वतःसाठी उभे रहा, आपलं आयुष्य घडवा कधी गरज पडेल तर सौम्य रूप बाजूला ठेवून रौद्र रूप ही दाखवा. *नवरात्री निमित्त माझं मागणं नसून सांगणं आहे की माझ्यावर असेच आशीर्वाद राहूदे, माझ्यामुळे कोणाला त्रास* *होऊन नये, किंवा कोणी दुखावला जाऊ नये, मला एक माणूस म्हणून चांगलं राहण्याची शक्ती आणि आशीर्वाद दे."*
*'पारू' मालिकेवर तुमच्या प्रेमाचा असाच वर्षाव होत राहू दे. बघायला विसरू नका 'पारू' दररोज संध्या ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*