Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘वनवास’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर! २० डिसेंबरला झळकणार सिनेमागृहात*

 *झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘वनवास’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख केली जाहिर! २० डिसेंबरला झळकणार सिनेमागृहात*


_नाना पाटेकर आणि गदर २ मधील भूमिकेकरता नावाजलेला उत्कर्ष शर्मा दिसणार प्रमुख भूमिकेत_


https://www.instagram.com/p/DBYFGvBIJ_M/?igsh=Z3ozajR6cTdwMTQ3



गदर: एक प्रेम कथा, अपने आणि गदर २ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसह झी स्टुडिओ आणि अनिल शर्मा यांनी यशाचा एक अद्भुत फॉर्म्युला निर्माण केला आहे. आणखी एक सिनेमॅटिक चमत्कार घडवून आणत, त्यांनी ‘वनवास’ नावाच्या त्यांच्या पुढील भव्य सिनेप्रकल्पाची विजयादशमीच्या मुहूर्तावर घोषणा केली होती आणि आता, कोणताही विलंब न लावता, त्यांनी हा उत्कट चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख घोषित केली आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सिनेगृहांत दाखल होईल.


‘वनवास’ ही एक चित्तवेधक कथा आहे, ज्याची संकल्पना ही कालातीत आहे. एका प्राचीन कथेचा प्रतिध्वनी या कथेतून व्यक्त होतो, ज्यात कर्तव्य, सन्मान आणि एखाद्याच्या कृतींचे परिणाम जीवनाचा आगामी मार्ग निश्चित करतात. चित्रपटाकडून असलेल्या वाढत्या अपेक्षेदरम्यान, निर्मात्यांनी अखेर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख निश्चित केली आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी दाखल होत, सिनेरसिकांची या वर्षाची अखेर उत्तम प्रकारे होईल याचे जणू वचन देतो. त्यांच्या समाजमाध्यमांवर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘वनवास’ प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली.


‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याकरवी आणखी एक उत्तम चित्रपट दाखल होत आहे- ‘वनवास’ या चित्रपटाची कथा चित्तवेधक आणि खिळवून ठेवेल अशी आहे. या चित्रपटात नाना पाटेकर आणि गदर २ मधील भूमिकेकरता नावाजलेले गेलेले उत्कर्ष शर्मा दिसणार आहेत.

अनिल शर्मा लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित ‘वनवास’ हा चित्रपट ‘झी स्टुडिओज’द्वारे जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.