आयुष्मान खुराना विसर्जनानंतर अमृता फडणवीस यांच्या बीच क्लीनअप ड्राईव्हमध्ये सहभागी
September 18, 2024
0
पर्यावरणपूरक गणपती: आयुष्मान खुराना विसर्जनानंतर अमृता फडणवीस यांच्या बीच क्लीनअप ड्राईव्हमध्ये सहभागी
युवकांचे आदर्श आणि बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुराना यांनी आज मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्याची सफाई करण्यासाठी दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस यांच्यासोबत भाग घेतला. हे सफाई अभियान खूप महत्त्वाचं होतं कारण मुंबईचे समुद्रकिनारे सणानंतर अनेकदा प्रदूषित होतात, जे समुद्री जीवांसाठी धोकादायक ठरू शकतं.
आयुष्मान खुराना दिव्याज फाउंडेशनच्या 'बच्चे बोले मोरया' उपक्रमांतर्गत 'सी शोर शाइन' क्लीनअप ड्राईव्हमध्ये सहभागी झाला , जिथे गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले. यावर्षी त्यांनी आपल्या मुलांसह पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची स्थापना केली होती, ज्यामुळं त्यांचा 'ग्रीन गणपती' कडेचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे.
समुद्रकिनारी क्लीनअप ड्राईव्हमध्ये बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला , "आपल्या पर्यावरणाची काळजी घेणं आणि भविष्यासाठी ते सुरक्षित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. सण साजरे करताना आपल्या पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करणं गरजेचं आहे, आणि आपलं नियोजन अधिक चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपण हरित भविष्याकडे वाटचाल करू शकू. आज येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं आणि तरुणांना पाहून आनंद झाला – मला अभिमान आहे की आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याला पर्यावरणाचं महत्त्व कळतं आणि त्यांनी आज इथं येऊन चांगल्या कामात सहभाग घेतला आहे!"