Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षागाथा १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षागाथा १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर ———————————— महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं तरी मराठवाडा निजामाच्या विळख्यातून मुक्त झाला नव्हता. मराठवाड्यातील जनतेने त्यासाठी उभारलेल्या अभूतपूर्व लढ्याला अखेर यश येऊन १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. या घटनेला १७ सप्टेंबरला ७६ वर्षं पूर्ण होत आहेत. या खास दिनाचे औचित्य साधत 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट येत्या १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर दु.२ वाजता आपल्या भेटीला येणार आहे. जास्तीजास्त प्रेक्षकांनी हा नाट्य माहितीपट पाहावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. महामंडळाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या माहितीपटात अजय पुरकर, समीर विद्वान्स, समीर धर्माधिकारी, सचिन देशपांडे, श्रीकांत भिडे, अभिजीत श्वेतचंद्र, अक्षय वाघमारे, पूजा पुरंदरे, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, ऋतुजा बागवे, दिप्ती धोत्रे, विराजस कुलकर्णी, आस्ताद काळे, आदिनाथ कोठारे, आशुतोष वाडेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
कोट मराठवाड्यातील मुक्तिसंग्रामाचा ऐतिहासिक कालखंड सर्वांना पाहता यावा यासाठी विविध माध्यमातून या माहितीपटाचे प्रसारण करण्याचे नियोजन शासन करत आहे. यातील एक भाग म्हणजे सहयाद्री वाहिनीवर प्रेक्षपण करत आहोत. स्वाती म्हसे पाटील व्यवस्थापकीय संचालक ——— या माहितीपटाचे दिग्दर्शक दिग्पाल सुनिल लांजेकर म्हणतात, ''इतिहास हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या स्वातंत्र्यवीरांचा संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. या ऐतिहासिक माहितीपटात तगड्या कलाकारांनी भूमिका साकारली असून यानिमित्ताने आम्ही मुक्तीसंग्राममध्ये सहभागी झालेल्या वीरांना आदरांजली वाहात आहोत.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.