*वेद आणि नलीला एकमेकांपासून दूर करण्याचा बाबरावचा मोठा प्लॅन*
September 30, 2024
0
*वेद आणि नलीला एकमेकांपासून दूर करण्याचा बाबरावचा मोठा प्लॅन*
*लग्नसोहळ्यात बाबारावचा नली आणि वेदला तोडण्यासाठी मोठं कारस्थान*
प्रेक्षकांना मोहित करणाऱ्या 'तिकळी' या मालिकेत आता एक रोमांचक वळण येणार आहे. वेद आणि नलीच्या प्रेमाची परीक्षा बाबरावच्या धूर्त योजनेमुळे होणार आहे. बाबराव, ज्याची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक साकारत आहेत, प्रोमोमध्ये पहिल्याप्रमाणे बाबाराव नलीकडून वचन घेतो की तिच्या भावाचं आणि मितालीचं लग्न लावून देईन पण त्यासाठी नलीने वेदपासून दूर जायचं. वेदवर तिचं प्रेम नाही हे सांगून ती वेदचं मन मोडते पण ह्या सगळ्या मागे बाबरावचा काय प्लॅन आहे ह्याबद्दल नलीला जराही कल्पना नाही.
बाबरावने ठरवल्याप्रमाणे ऋषीला लग्नातून गायब करून बाबराव स्वतःच्या मुलाला, वेदला, मितालीसोबत लग्नासाठी तयार करतो. सगळं नियोजन जुळवून बाबरावची योजना यशस्वी होणार का ? नली लग्नमंडपात पोहचू शकेल का ? वेद आणि नली ह्या कारस्थानामुळे दूर जातील का? वेद आणि नलीचं काय असेल भविष्य? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या लग्न सोहळयात पाहायला मिळणार आहे.
*त्यासाठी ‘तिकळी’ लग्नसोहळा विशेष भाग पाहायला विसरू नका, २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर रात्री १०:०० वाजता, फक्त सन मराठीवर!*