*शत्रू पासून, तुळजा सूर्याला वाचवू शकेल ?*
September 28, 2024
0
*शत्रू पासून, तुळजा सूर्याला वाचवू शकेल ?*
*सूर्या आणि सिद्धार्थचा आमना-सामना*
*'लाखात एक आमचा दादा'* मालिकेत सूर्याच्या घरामध्ये तुळजा रुळू पाहतेय. तिचं आणि तिच्या नणंदा मध्ये नवीन नातं फुलताना दिसतंय. पण दुसरीकडे तुळजाचा भाऊ, शत्रू त्याला भयंकर त्रास होतोय आणि तो सूडभावनेने सूर्या वरती पुन्हा एकदा हल्ला करायचं ठरवतो. या हल्ल्यामध्ये दादाला दुखापत होणार पण दादा थोडक्यात पुन्हा एकदा बचावतो. जिथे भाग्यश्रीला मात्र दादाची भयंकर काळजी वाटतेय. ती दादाला काहीही न करण्याचा आणि घराबाहेर न पडण्याचा सल्ला देते. सूर्याही तिला दिलासा देतो की काळजी करू नकोस मला काही होणार नाही. पण सूर्याच्या अपघातानंतर तुळजाच्या मनात प्रश्न येतात की कोणीतरी खरंच आपल्यावरती नजर ठेवून आहे, ही व्यक्ती शत्रू असू शकेल का आणि त्याने सिद्धार्थला पण असंच काही केलं असेल का असे अनेक प्रश्न तिच्या मनात येतात.
दुसरीकडे तुळजाला कळतं की या बहिणींचा घरामध्ये एक सिक्रेट मोबाईल आहे आणि तो त्यांनी दादा पासून लपवून ठेवलेला आहे. या सिक्रेट गोष्टी मध्ये आता तुळजा सुद्धा सहभागी झालेली आहे. हे दादालाही कळतं की घरामध्ये मोबाईल आहे आणि तो भयंकर चिडतो. त्यावेळी तुळजा बहिणींसाठी उभी राहते. .दादाला, तुळजाच म्हणणं पटतं. दुसरीकडे तुळजाकडे पण मोबाईल नाहीये तिला पण मोबाईल लागणार म्हणून दादा मोबाईल घ्यायला शहरात जातो त्यावेळी पहिल्यांदा त्याला सिद्धार्थ नजरेस पडतो.
*सूर्यादादा आणि सिद्धार्थचा आमना-सामना होईल ? सूर्याच्या जीवाला अजूनही धोका आहे ? बघायला विसरू नका 'लाखात एक आमचा दादा' दररोज रात्री ८:३० वा. फक्त झी मराठी वाहिनीवर.*