Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"माझ्या मनात पहिला विचार आला अरे बापरे ! जमेल का आपल्याला "- वीणा जगताप*

*"माझ्या मनात पहिला विचार आला अरे बापरे ! जमेल का आपल्याला "- वीणा जगताप* *‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप, ऐश्वर्या मेहेंदळेची भूमिका साकारणार आहे* . आपल्या भूमिकेबद्दल संवाद साधताना वीणाने बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. "या मालिकेत मी ऐश्वर्या मेहेंदळेची भूमिका साकारत आहे. ती खूप महत्वाकांक्षी आहे, तिला तिच्या पुढे कोणी गेलेलं आवडत नाही. तिचं लग्न अश्या घरी झाले आहे जिथे तिच्या सासूबाईंना फक्त सुंदर गोष्टीच आवडतात. ऐश्वर्या मिस पुणे आहे आणि जेव्हा तिलोत्तमा पहिल्यांदा ऐश्वर्याला पाहते तेव्हा हीच सून हवी असं ठरवते. ऐश्वर्या जरी हाऊसवाईफ असली तरीही ती स्वतः काही काम न करता लोकांनकडून काम करवून घेते. तिलोत्तमाची लाडकी सून आहे ऐश्वर्या. मला जेव्हा या मालिकेच्या ऑडिशनसाठी कॉल आला तेव्हा मी हिमाचल प्रदेश मध्ये फिरायला गेले होते. तिथे नेटवर्कही पुरेसं नव्हतं. पण मला तो कॉल आला ‘सावळ्याची जणू सावली’ नावाचा एक शो आहे आणि एक भूमिकेसाठी तुझं ऑडिशन करायचे आहे, भूमिका नकारात्मक आहे तर तुला आवडेल का ऑडिशन द्यायला. माझ्या मनात पहिला विचार आला अरे बापरे ! जमेल का आपल्याला, कारण सकारात्मक भूमिकेच्या तुलनेने नकारात्मक भूमिका थोड्या कठीण असतात असं मला वाटतं. माझ्याकडे एक स्क्रिप्ट आली ऑडिशनसाठी.
साडी किंवा सलवार कमीज मध्ये ऑडिशन पाठवायची होती. मी फिरायला गेली होती तर फक्त ट्रॅव्हलचे कपडे नेले होते. मी ऑडिशन पाठवली, पण त्यांना ती नाही आवडले. त्यांनी सांगितले पुढे काही असेल तर कळवू. मी ट्रिपवर होते तर मी तेवढं मनावर नाही घेतलं. सुट्टी वरून आली आणि मला परत कॉल आला की तू लुक टेस्टसाठी येऊ शकशील का, मी लुक टेस्ट दिली आणि त्याच दिवशी माझी उज्जैनची ट्रेन होती. मी महाकालला जात होते. दुसऱ्या दिवशी मी देव दर्शनासाठी गेली माझं दर्शन झाले आणि मी मंदिरातून बाहेरच पडत होते आणि तेव्हाच मला कॉल आला की तुझी निवड झाली आहे. मला प्रचंड आनंद झाला आणि दडपणही तेवढच आलं. माझी आई होती सोबत ती म्हणाली तुला प्रसाद मिळाला . जेव्हा पहिल्यांदा प्रोमो आला आणि मला मिक्स प्रतिसाद मिळाला नकारात्मक भूमिका का करतेय म्हणून. पण माझं असं आहे की प्रायोगिक असलं पाहिजे आणि मला ही बघायचे आहे की मी अश्या भूमिकेला न्याय देऊ शकेन का. माझं असं ही मत आहे की मी अजून तितकी मोठी अभिनेत्री झाली नाहीये. म्हणजे पॉप्युलर होणं आणि मोठी अभिनेत्री होणं दोन वेगळ्यागोष्टी आहेत. मी पॉप्युलर असू शकते पण ग्रेट अभिनेत्री नाही आणि त्यासाठी मला अश्या आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायची संधी मिळत असेल तर मला त्या करायच्या आहेत. आता आव्हान घेतलं आहे आणि मेहनत करायची तयारी आहे. बघूया प्रेक्षक कशी साथ देतील. आमच्या सेटवर मस्त वातावरण आहे, सुलेखा ताई आणि मानसी आम्ही एका मके-अप रूम मध्ये असतो. खूप छान नातं निर्माण झालाय आमच्या मध्ये. नवीन मालिका आहे तर सध्या फक्त काम आणि सीन्स बद्दल चर्चा होते. मोकळयावेळा मध्ये एकतर विनोद करतो किंवा सीन्स आले असतील तर सीन्स डिसकस करतो. मी एक नंबर खवय्ये आहे म्हणजे मला बोलायची गरज नाही कारण २०१८ ची वीणा आणि आजची वीणा बघूनच कळालं असेल. माझ्या ऍक्टिंग करिअरची सुरवात अशी झाली कि मी उल्हासनगरला एका मीडिया हाऊस मध्ये बातमी वाचक म्हणून काम करत होते. मग मला लोकल ब्रँडच्या जाहिराती मिळायला लागल्या. त्यानंतर हिंदी मालिकांमध्ये कॅमिओ केले. त्यातली एक मालिका झी टीव्हीची 'कुमकुम भाग्य' ज्या मध्ये बुलूबुल (मृणाल ठाकूर) च्या मैत्रिणीची भूमिका केली. मग मराठी मनोरंजन विश्वात माझा प्रवास सुरु झाला. मला खायला खूप आवडत. झटपट शॉपिंग करायला ही आवडत. ट्रॅव्हल करायला आवडत. आता मी हिमाचल प्रदेशला सोलो ट्रिपवर गेले होते. मला कसं ही फिरायला आवडत फक्त मज्जा आली पाहिजे. मला भजन ऐकायला आणि वाचन करायला ही आवडत.” *वीणा जगताप पहिल्यांदा एक नकारात्मक भूमिका साकारत आहे.* *तेव्हा बघायला विसरू नका ‘सावळ्याची जणू सावली’ दररोज संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.