Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*ढोल-ताशाच्या गजरात झी मराठी अवॉर्ड्स २०२४ वोटिंग फ्लॅग ऑफ !*

*ढोल-ताशाच्या गजरात झी मराठी अवॉर्ड्स २०२४ वोटिंग फ्लॅग ऑफ !* *तुमचं एक मत ठरवणार महाराष्ट्राची आवडती मालिका !*
गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या शुभमुहूर्तावर *‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’* मतदान प्रक्रियेला एका भव्य फ्लॅग ऑफ समारंभात प्रारंभ झाला आहे. *झी मराठी यंदा आपलं* *२५ वर्ष* साजरं करत आहे. त्यामुळे यंदाचा झी मराठी अवॉर्ड खास असणार हे नक्की.
'नवरी मिळेल हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांच्या तुमच्या लाडक्या कलाकारांनी पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात फ्लॅग ऑफ केला. *वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमीजा पाटील, सानिका काशीकर, प्रसाद लिमये , अक्षय म्हात्रे, अक्षया हिंदळकर* , यांनी प्रेक्षकांना मतदानाचं आवाहन केलं. महाराष्ट्रभरात होणाऱ्या या मतदान प्रक्रियेत प्रेक्षकांनी भरभरून मतदान करण्याचं आवाहन आपले कलाकार करत आहेत.
२५ दिवस चालणाऱ्या या *मतदान प्रक्रियेची शेवटची तारीख असणार आहे* *५ ऑक्टोबर २०२४.* यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राइझेस घेऊन येणार आहे. तेव्हा उत्सवाची तयारी सुरु करा आणि झी मराठीवरील आपल्या आपल्या आवडत्या कलाकारांना आणि मालिकेला भरभरून मत द्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.