कौन बनेगा करोडपती १६ ‘केबीसी ज्युनियर्ससाठी नोंदणी सुरू
September 08, 2024
0
कौन बनेगा करोडपती १६ ‘केबीसी ज्युनियर्ससाठी नोंदणी सुरू
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा अतिशय लोकप्रिय असलेला गेम शो, 'कौन बनेगा करोडपती १६,'ने त्याची बहुचर्चित विशेष थीम “केबीसी ज्युनियर्स’ पुन्हा सुरू करत आहे.
८ ते १५ वयोगटातील मुलांना भारतातील सर्वात प्रतिष्ठित असललेल्या क्विझमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. केबीसीच्या या सत्राचे सूत्रसंचालन महानायक अमिताभ बच्चन करणार आहेत. अमिताभ या सर्व बालगोळांचा उत्साह वाढून त्यांना शोध्मये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहेत.
आपल्या पाल्यांना केबीसीमध्ये सहभागी करण्यासाठी पालक सोनी एलआयव्ही (SonyLIV) ॲप डाउनलोड करून नोंदणी करू शकतात. तसेच मुलासाठी प्रोफाइल तयार करू शकतात. नंतर दररोज विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ९ सप्टेंबर रोजी याची नोंदणी बंद होईल.
तर “केबीसी ज्युनियर्स’ खेळण्यासाठी तयार राहा आणि आपले नशीब अजमावून पहा.
ॲपची लिंक: https://www.instagram.com/reel/C_aSCw6PVkg/?igsh=ZzMzemFkMGpwMTdz
पुढील अपडेट्स आणि तपशीलांसाठी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनशी संपर्कात रहा!