Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वरूप भालवणकर , दिग्गज गायक सुदेश भोसले आणि प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया घेऊन आले आहेत "बाप्पाचा बोलबाला"

*लाडक्या बाप्पासाठी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर , दिग्गज गायक सुदेश भोसले आणि प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया घेऊन आले आहेत "बाप्पाचा बोलबाला"* दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात येणारी नवनवी गाणी गणेशभक्तांना फार आनंद देतात. पण मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात "बाप्पाचा बोलबाला" हे गाणं सगळीकडे वाजणार आणि गाजणार सुद्धा आहे. "बाप्पाचा बोलबाला" हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला आहे.
पॉवर पॅक्ड आणि एनर्जी ने भरपूर असा हा गणेशाचा ट्रॅक असून या गाण्याचे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर हे आहेत. दिग्गज गायक सुदेश भोसले ह्यांनी सुद्धा ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. सुदेश भोसले ह्यांनी आपल्या आवाजाने आजवर गणेश उत्सवाची शान वाढवली आहे. इतकच नव्हे तर प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया पहिल्यांदाच सिंगर म्हणून या विडिओ द्वारे पदार्पण करत आहे. आरजे अर्चनाला स्वतः विश्वास बसत नव्हता कि त्यांना ही सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यांचं म्हणणं आहे कि "गणपती बाप्पा ने मला दुसऱ्यांदा संगीतकार स्वरूप भालवणकर ह्यांच्या मुळे निवडला आहे." बॉलीवूड गीतकार कुमार यांनी या गाण्याचे बोल अगदी अप्रतिमपणे लिहिले आहे. युनिव्हर्स व्हायब्रंट आणि मोरया क्रिएशन्सद्वारे हे गाणं रिलीझ केलं गेलं आहे. तर सोशल मीडिया इन्फ्लूएंसर तन्मय पाटेकर ह्या गाण्यात आपल्याला पाहायला मिळतील. युनिव्हर्स व्हायब्रंटचे स्वरूप भालवणकर आणि प्रशांत थोपील यांनी या गाण्याची संकल्पना मांडली आहे, त्यांना खात्री आहे की "बाप्पाचा बोलबाला" या वर्षाच्या गणेश उत्सवासाठी सर्व मंडळे आणि गणेशभक्तांच्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच असणार.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.