Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कानाच्या दुखापतीवर मात करुन अभिनेत्री जुई गडकरीने पुन्हा जोमाने सुरुवात केलीय ठरलं तर मगच्या शूटिंगला

विघ्नहर्ता बाप्पाच देतो लढण्याचं बळ कानाच्या दुखापतीवर मात करुन अभिनेत्री जुई गडकरीने पुन्हा जोमाने सुरुवात केलीय ठरलं तर मगच्या शूटिंगला इच्छा तिथे मार्ग... या म्हणीचा अनुभव नुकताच घेतलाय ठरलं तर मग मालिकेतील सर्वांची लाडकी सायली अर्थातच अभिनेत्री जुई गडकरीने. जुईची ठरलं तर मग मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. जुईच्या सहजसुंदर अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. सायली या व्यक्तिरेखेवर जुईचंही मनापासून प्रेम आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच जुईने शूटिंगमधून काही दिवसांचा ब्रेक घेतला. कारण होतं एका छोट्या अपघातामध्ये जुईच्या कानाला झालेली दुखापत. औषधोपचार घेऊन बरं वाटेल असं सुरुवातीला जुईला वाटलं मात्र हे दुखणं दिवसागणिक वाढत गेलं. डॉक्टरांकडे पुन्हा तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवण्यात आला. जुईसाठी हा काळ अत्यंत कठीण आणि कसोटीचा होता.
मालिकेत प्रतिमाच्या एण्ट्रीनंतर सायली आणि प्रतिमाचे अनेक भावनिक प्रसंग सुरु आहेत. जुईने एका इमोशनल सीनसाठी अंगाई देखिल गायली. कानाच्या पडद्याला इजा झाल्यामुळे आवाजातले चढ-उतार कळत नव्हते. मात्र मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले आणि संपूर्ण टीमने जुईला धीर दिला आणि जुईने खूप उत्तमरित्या हे सीन साकारले. शस्त्रक्रियेसाठी आठवडाभराची रजा गरजेची होती. जुईने शूटिंग संपवून मगच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जुईच्या सीन्सना प्राधान्य देऊन शूटिंगची आखणी केली गेली. यासाठी जुईने स्टार प्रवाह वाहिनी, सहकलाकार आणि ठरलं तर मगच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. बाप्पाचा आशीर्वाद आणि संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळेच मी हे करु शकले असं जुई गडकरी म्हणाली. ठरलं तर मग आणि सायलीवर असंच प्रेम करत रहा अशी मागणीही तिने प्रेक्षकांना केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.