Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संजीवनी भेलांडे यांना तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांच्या शुभहस्ते प्रदान

भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा " दीदी " पुरस्कार आज शनिवार दिनांक 28 सप्टेंबर ला दीदींच्या जन्मदिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या " ते श्री शारदा विश्वमोहिनी लतादीदी " या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका संजीवनी भेलांडे यांना तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांच्या शुभहस्ते आणि शरद पोंक्षे, सोनाली कुलकर्णी, सोनु निगमजी, सौ. भारती मंगेशकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे प्रदान करण्यात आला.
या आधी हा पुरस्कार पंडित सत्यशील देशपांडे , विभावरी आपटे जोशी यांना देण्यात आला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, भेट वस्तू, स्मृती चिन्ह आणि रोख रक्कम असे आहे. या कार्यक्रमात MIT च्या विद्यार्थ्यांनी गणराज रंगी नाचतो या गण्यावर नृत्याविष्कार करून गणेश वंदना केली. त्या नंतर संजीवनी भेलांडे, अजित परब, डॉ. श्रेयसी पावगी, मनिषा निश्चल, डॉ. उन्मेष करमरकर, विभावरी जोशी यांनी उत्तमोत्तम मराठी हिंदी गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दीदींच्या काही खास आणि कोणालाही माहीत नसलेल्या आठवणी वेगवेगळ्या दुर्मिळ आणि प्रसंगानुरूप फोटो मोठ्या पडद्यावर दाखवून विभावरी जोशी यांच्या कडून त्या त्या प्रसंगांची गाणी गाऊन घेतली आणि कार्यक्रम एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला.
या कार्यक्रमाचे वाद्यवृंद संयोजन विवेक परांजपे यांनी केले. केदार परांजपे, दर्शना जोग सिंथेसायजर, विशाल थेलकर गिटार, निलेश देशपांडे बासरी, विक्रम भट तबला व एकतारा, विशाल गंड्रतवार तबला - ढोलक , अजय अत्रे रिदम मशिन, पद्माकर गुजर पर्कशन्स या वादक कलाकारांनी बहारदार साथसंगत केली. ध्वनी व्यवस्था आयान मोमिन यांची होती. हा संपूर्ण कार्यक्रम पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेतून साकार झाला. त्यामुळे रसिकांच्या दिर्घकाळ स्मरणात राहील असा
हा कार्यक्रम पंडितजींनी सादर केला . कार्यक्रमाची व्यवस्था मनोरंजनचे शिरीष रायरीकर यांच्या कडे होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.