Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'विश्वशांतीदूत वसुधैव कुटुंबकम'- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागतिक एकतेच्या व्हिजनचा सन्मान करणारा एक अनोखा सूरमयी सुसंवाद*

*'विश्वशांतीदूत वसुधैव कुटुंबकम'- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागतिक एकतेच्या व्हिजनचा सन्मान करणारा एक अनोखा सूरमयी सुसंवाद*
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे "विश्वशांती दूत - वसुधैव कुटुंबकम्" हा विलक्षण संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या तत्त्वावर मोदींचा विश्वास आहे. विश्वाला एक मानण्याची त्यांची ही अभिव्यक्ती कमालीची आहे. त्यांच्या या अभिव्यक्तीला दैवी स्वर आणि काव्यात्मक श्लोकांद्वारे सादर करण्यात आले. वसुधैव कुटुंबकम सर्व देशांच्या सीमा ओलांडून शांततेच्या मार्गावर सर्व राष्ट्रे आणि नागरिकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे.पद्मश्री पंडितजी हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर, यांनी सादर केलेली ही भव्य स्वरांजली भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि त्याच्या समरसतेच्या अमर संदेशाचा पुरावा देणारी आहे. आदिनाथ मंगेशकर आणि निसर्ग पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पात रूपकुमार राठोड यांची मंत्रमुग्ध करणारी संगीत रचना सादर झाली. कवी डॉ. दीपक वझे यांचे स्फुरण देणारे शब्द आणि पद्मश्री शंकर महादेवन आणि निसर्ग पाटील यांचे स्वर्गीय आवाज या स्वरांजलीच्या निमित्ताने एकत्र आले.
या सगळ्यांनी एकत्रितपणे जागतिक एकतेचा संदेश जगाला दिला आहे.राष्ट्रांमध्ये शांतता आणि एकता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान मोदी वचनबद्ध आहेत हा या उत्सवाचा आत्मा आहे. जगात भविष्यात सर्व मानव एकसंध राहावेत. विभाजनांपासून मुक्त व्हावेत यासाठी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी, वसुधैव कुटुंबकम, विश्वशांती दूत मैफिलीचे आयोजन करण्यात आले जे एका मैफिलीपेक्षाही खूप मोठा उपक्रम आहे. संगीत सर्व समस्यांवरील उपाय आहे आणि जग एकत्र आणण्यासाठीही संगीताचा वापर केला जाऊ शकतो हे या उपक्रमातून समोर आणण्यात आले.आदिनाथ मंगेशकर आणि निसर्ग पाटील यांचे सहकार्य, रूपकुमार राठोड यांचे संगीत, डॉ. दीपक वझे यांची काव्य प्रतिभा आणि पद्मश्री शंकर महादेवन आणि निसर्ग पाटील यांचे गायन यांनी या उपक्रमाला चार चांद लावले.
या उपक्रमाला भाजप नेते आशिष शेलार आणि हितेश जैन यांनी पाठिंबा दिला आहे. हा संगीतमय महोत्सव म्हणजे जगात शांततेची किती आवश्यकता आहे ते अधोरेखित करणारा आहे. ज्या व्यक्तीने संपूर्ण जगाला एकत्र आणण्यासाठी आपले जीवन झोकून दिले आहे त्या व्यक्तीचा म्हणजे पंतप्रधान मोदींचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे.हा केवळ एक संगीतमय कार्यक्रम नाही तर संपूर्ण जग एका सुत्रात म्हणजेच शांततेच्या बंधांत जोडण्याचा एक पवित्र क्षण आहे, भारतातील महान प्रतिभावान त्यांच्या कलात्मकतेद्वारे विश्व शांतीदूत वसुधैव कुटुंबकमचे सार टिपणारी स्वरांजली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.