*अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांचं "गाणं 'वाजणार गं गाजणार गं'*
September 04, 2024
0
*अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांचं "गाणं 'वाजणार गं गाजणार गं'*
*४ ऑक्टोबरला येतोय 'एक डाव भूताचा'*
गायक अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांच्या आवाजतलं "वाजणार गं गाजणार गं...." हे गाणं "एक डाव भूताचा" या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातलं हे गाणं सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. सिद्धार्थ जाधवबरोबर मयुरी देशमुख यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे.
रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.
सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी एक डाव भूताचा या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधवबरोबर मयुरी देशमुख या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांनी या पूर्वी अनेक हिट गाणी दिली आहेत. आता उत्तम शब्द, संगीत असलेल्या "वाजणार गं गाजणार गं..." या गाण्याची त्यात भर पडणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता ४ ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागणार आहे.
*Song Link*
https://youtu.be/S0GyvElm7Qk?si=goL9-T6oHIEzaucV