Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राणी मुखर्जी कॅन्सर जनजागृतीसाठी वर्ल्ड रोज डे निमित्त मुंबईच्या बांद्रा-वर्ली सी लिंकला लाल रंगात प्रकाशमान करणार

राणी मुखर्जी कॅन्सर जनजागृतीसाठी वर्ल्ड रोज डे निमित्त मुंबईच्या बांद्रा-वर्ली सी लिंकला लाल रंगात प्रकाशमान करणार प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री राणी मुखर्जी वर्ल्ड रोज डे निमित्त कॅन्सर पॅशंट्स एड असोसिएशन (CPAA) सोबत भागीदारी करत आहेत. या खास दिवशी राणी मुंबईच्या बांद्रा-वर्ली सी लिंकला लाल रंगात प्रकाशमान करून कॅन्सरविषयी जनजागृती करणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमात राणीसोबत काही लहान कॅन्सरग्रस्त मुलंही सहभागी होणार आहेत.
राणी म्हणाली, “या महत्त्वाच्या कारणासाठी पाठिंबा देण्याची संधी मिळाल्याने मी खरोखर कृतज्ञ आहे. मला या उदात्त ध्येयाचा भाग बनवल्याबद्दल कॅन्सर पॅशंट्स एड असोसिएशनचे आभार. जे लोक या रोगाशी झुंजत आहेत त्यांना आपल्या सहकार्याची आणि करुणेची गरज आहे आणि आपण सर्वांनी कॅन्सरबद्दल शिक्षित होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मला आशा आहे की ही कृती जनजागृती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल.” राणी पुढे म्हणाली , "कलाकार म्हणून आपल्याला आपल्या प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं. यामुळे आपल्याला जबाबदारी येते की गरजेच्या वेळी आपण आपला वाटा उचलावा. मला विश्वास आहे की कलाकारांनी आपला आवाज महत्त्वाच्या विषयांवर, जसे कॅन्सर, जनजागृतीसाठी वापरला पाहिजे. कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्यासोबत झुंजणाऱ्या कुटुंबांसाठी करुणेचे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांद्वारे हे संदेश प्रभावीपणे पोहोचवले जाऊ शकतात." राणी मुखर्जी या कार्यक्रमात सहभागी मुलांना गुलाब आणि भेटवस्तू देणार आहे. वर्ल्ड रोज डे १२ वर्षीय मेलिंडा रोज यांच्या स्मृतीमध्ये साजरा केला जातो, ज्यांना अस्किन्स ट्यूमर, एक दुर्मिळ ब्लड कॅन्सर, आढळला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.