*भक्तिमय वातावरणात आम्ही 'सावळ्याची जणू सावली' ची सुरुवात केली आहे- मेघा धाडे*
September 28, 2024
0
*भक्तिमय वातावरणात आम्ही 'सावळ्याची जणू सावली' ची सुरुवात केली आहे- मेघा धाडे*
*संगीताच्या परंपरेला जपणारी आणि सुप्रसिद्ध गायिका आहे भैरवी वझे- मेघा धाडे*
*‘सावळ्याची जणू सावली’* मालिकेत अभिनेत्री *मेघा धाडे,* भैरवी वझेची भूमिका साकारणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल संवाद साधताना मेघाने बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला. "माझ्या भूमिकेचं नाव आहे *भैरवी वझे, ती एक अतयंत महत्वाकांक्षी बाई, सुप्रसिद्ध गायिका आहे* . तिने शास्त्रीय संगीतात मोठं नाव कमावलं आहे. स्वतःच गुरुकुल असेल अशी ही भैरवी. ती आपल्या संगीताच्या परंपरेला जपण्यासाठी कुठल्याही थरावर जाऊ शकते, किंवा संगीताचा वारसा नेण्यासाठी साधण्यासाठी परिसीमा कशी गाठते तो भैरवीचा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहता येणार आहे. माझी निवड कशी झाली हा एक गंमतशीर किस्सा आहे. इतकी लवकर कास्टिंग प्रक्रिया आजवर कोणाचीच झाली नसावी जितक्या लवकर माझी निवड या भूमिकेसाठी आणि मालिकेसाठी झाली. माझी इथे आज लुक टेस्ट आणि लगेच दुसऱ्या दिवशी शूट सुरु इतक्या लगेच ते सगळं जुळून आलं. सर्वात आधी कलाकाराला भूमिका आवडली पाहिजे, मग प्रोडक्शन आवडलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनेलने त्यांचा होकार दिला पाहिजे. मी खूप खुश आहे की इतकं सुंदर पात्र माझ्या पदरात पडलं. जेव्हा ‘ *सावळ्याची जणू सावली’ चा प्रोमो आऊट झाला तो दिवस माझ्यासाठी कुठच्या उत्सवा पेक्षा कमी नव्हता,* कारण ज्यादिवशी प्रोमो आला त्यादिवशी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आला आणि त्यासोबत मित्रपरिवाराचा आणि मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकारांचे फोन आले इतका छान प्रतिसाद मिळाला. मला वाटतं की सर्व आतुरतेने वाट पाहत असावे म्हणून प्रेमाचा सगळीकडून भरभरून वर्षाव झाला. भैरवीला मालिकेत पाहून प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असणार हे ही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आम्ही अनेक ठिकाणी शूट केले. माझा एन्ट्री सीन आहे तो आम्ही भोर मधल्या सुंदर मंदिरात शूट केला. हे मंदिर पावन झाले आहे संत सोपान महाराजांच्या समाधींनी. आऊटडोअर शूटच्या आठवणी बद्दल बोलायचे झाले तर कानावर सतत भजन आणि टाळाचा आवाज येणं अश्या भक्तिमय वातावरणात आम्ही शूटिंग करत होतो. जेव्हा सीन मधून वेळ मिळत होता तेव्हा आम्ही भजनी मंडळात सहभाग घेऊन स्वतः फुगड्या घातल्या, आम्ही भक्तीरंगात इतके तल्लीन झालो होतो की क्षणभर विसरलो आम्ही तिथे शूटसाठी आलो आहोत. मला वाटतं *अश्या पद्धतींनी जर शूटिंगची सुरुवात होत असेल तर त्याचा परिणाम छानच होणार कारण पांडुरंगाचे आशिर्वाद आमच्यावर सोबत आहेत.* आमची त्याच्यावर श्रद्धा आहे. या मालिकेला भरभरून यश मिळेल याची मी नक्कीच अपेक्षा ठेवते. सेटवर कलाकार आणि टेक्निशियन टीम आम्हा सर्वांमध्ये इतकं छान नातं तयार झालं आहे की कळतंच नाही आम्ही नवीन परिवारात सामील झालो आहोत. असं वाटतंय आम्ही वर्षानुवर्ष एकत्र काम करत आहोत. आमचा एक व्हॉट्स ऍप ग्रुप ही तयार झाला आहे जिथे आम्ही दिवसभरात शूटिंगवर काय घडले ते एकमेकांना सांगतो. प्राप्ती रेडकर आमच्या मालिकेची नायिका आणि भाग्यश्री दळवी जी माझ्या मुलीची भूमिका साकारत आहे या दोन मैत्रिणी मिळाल्या आहेत मला. मालिकेत भैरवीची मैत्रीण तिलोत्तमा म्हणजेच सुलेखा तळवलकर हिच्याशी अनेक वर्षांनी भेट झाली आणि आता आम्ही एकत्र काम करणार आहोत तर खूप मस्त वाटतंय.
एकंदरीत 'सावळ्याची जणू सावली' चा आमचा जो परिवार आहे तो एकदम प्रेमळ आहे, खूप खुश आहे मी या परिवाराचा भाग होऊन. माझ्या ऍक्टिंग करिअरची सुरवात वयाच्या ६व्या वर्षा पासून झाली, जेव्हा मी बालनाट्यानं मध्ये काम करायला सुरुवात केली. खान्देश नाट्य प्रतिष्ठान नावाच्या संस्थेच्या निम्मिताने मला अनेक बालनाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ते करता करता राज्य नाट्य स्पर्धेत उतरायची संधी मिळाली आणि ते करताच २००० सालच सर्वात्कृष्ट अभिनेत्रीच भव्य पदकही मला मिळालं. माझ्यासाठी ही सर्वात मोठी पावती आहे माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीतली. माझी १२वीची परीक्षा संपवून मी मुंबईत आले आणि तिथून सुरु झाला मालिका आणि सिनेमाचा प्रवास. माझ्या छंदा बद्दल बोलायचे झाले तर अभिनय हाच माझा आवडता छंद आहे. अभिनय हा माझा श्वास आहे . माझ्या जगण्याचं निम्मित आहे अभिनय. ज्यादिवशी माझं अभिनय करणं थांबेल त्यावेळेला कदाचित माझं श्वास घेणं थांबेल. मधल्या काळात जेव्हा मी रिऍलिटी शो करता करता खूप छान यश मिळवत होत, तेव्हा कुठेतरी मनाला सतत एक हुरहूर असायची खूप काही करत आहोत, पैसे ही छान कमवत आहोत. पण अभिनयाला आपण कुठेतरी मुकतोय का असा मनाला खात होत आणि मग मी निश्चय केला की जिथून माझं मनोरंजन विश्वात पदार्पण झालं म्हणजे मालिका विश्वात परतायचं. ती म्हण आहे ना "तेथे जे हरवत, तिथेच ते सापडतं". तश्याच पद्धतींनी जो आनंद माझा मालिकांमध्ये काम करण्याचा हरवल्यासारखा झाला होता तो मला पुन्हा तिथेच सापडला आहे. मी प्रचंड खुश आहे आणि तोच आनंद मी माझ्या कामातून प्रेक्षकांना नक्की देईन अशी आशा आहे."
मालिकेच्या प्रत्येक भूमकेवर प्रेमकरा आणि आम्ही तुमच्या मनोरंजनामध्ये काही कमी ठेवणार नाही. तुम्हाला भेटायला येतेय *‘सावळ्याची जणू सावली’ २३ सप्टेंबरपासून रोज संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*