अल्ट्रा झकासच्या यशानंतर,अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट ग्रुपने लाँच केले दोन नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म
September 05, 2024
0
अल्ट्रा झकासच्या यशानंतर,अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट ग्रुपने लाँच केले दोन नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म
'अल्ट्रा प्ले' आता सर्वांसाठी उपलब्ध: सादर करत आहोत केवळ हिंदी कंटेन्ट असलेला भारतातील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म, आपल्या वैविध्यपूर्ण चित्रपट संग्रहाच्या माध्यमातून प्रत्येक घरात अनुभवता येणार परिपूर्ण मनोरंजन.
'अल्ट्रा गाने' चे पदार्पण: 'अल्ट्रा गाने' वर पाहता येणार लोकप्रिय गाण्यांची सुरेल मैफिल, सोबतच मिळणार तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी गीते.
मुंबई, 5 सप्टेंबर 2024: अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुपने हिंदी सिनेमा आणि संगीताचा समृद्ध वारशाचा सन्मान करणारे दोन ओटीटी प्लॅटफॉर्म आज लॉन्च केले. 'अल्ट्रा प्ले' आणि 'अल्ट्रा गाने' हे दोन प्लॅटफॉर्म्स लॉन्च करत कंपनीतर्फे क्लासिक बॉलिवूड चित्रपट आणि सदाबहार हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांना वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल अनुभव प्रदान करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दशके भारतीय मनोरंजनाचा गाभा दर्शविणाऱ्या चित्रपट व गाण्यांचा संग्रह या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करण्यात आला असून बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांचा सन्मान करण्यात आला आहे. यात चित्रपटांच्या इतिहासातील मौल्यवान रत्ने आणि प्रख्यात क्लासिक्स रिस्टोअर केलेल्या फॉरमॅटमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
'अल्ट्रा प्ले' यावर सर्वाधिक कंटेन्टचा संग्रह आहे. कंपनीच्या 'हर पल फिल्मी' या फ्लॅगशिप कॅम्पेन अंतर्गत हिंदी क्लासिक चित्रपट स्ट्रीम करण्यासाठीचे हे भारतातील पहिले ओटीटी अॅप आहे. बॉलीवूडच्या सुवर्णकाळांमधील विविध धाटणीच्या व शैलीच्या २००० हून अधिक निवडक चित्रपटांचा खजिना या अॅपवर आहे. यामध्ये १९५० पासून आतापर्यंत प्रदर्शित झालेले अनेक ब्लॉकबस्टर कल्ट क्लासिक चित्रपट समाविष्ट आहेत. 'अल्ट्रा प्ले'च्या निमित्ताने या सिनेमॅटिक क्लासिक चित्रपटांचा पुन्हा एकदा आस्वाद घेता येणार आहे आणि आजच्या प्रेक्षकांनाही खिळवून ठेवणारा चित्रपटांचा खजिना पाहता येईल. 'हर जमाने का कंटेन्ट' असलेला हा प्लॅटफॉर्म अत्यंत समाधान देणारा मनोरंजनाचा अनुभव देतो. सोबतच संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून हा अनुभव घेता येईल.
अल्ट्रा मीडिया व एंटरटेनमेंट ग्रुपचे सी.ई.ओ श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, "आतापर्यंत अल्ट्राने हिंदी, मराठी व इतर भाषांमधील अनेक चित्रपटांचे हक्क संपादित केले आहेत. त्याचप्रमाणे आमचे ओटीटी अॅप्स सुरू करणे, हे साहजिक व्यवसाय विस्तारीकरण आहे. भारतातील समृद्ध सिनेमांचा व सांगीतिक वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत सातत्याने पोहोचविण्याच्या वाटचालातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जुने हिंदी चित्रपट आणि गाणी अजूनही पाहिली जातात आणि या अॅप्समुळे प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची लोकप्रियता नक्कीच वाढेल. भविष्यातील ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून इतर भाषांमध्ये विस्तारीकरण करण्यासाठीच्या संधी आम्ही जाणून घेत आहोत."
'अल्ट्रा प्ले' या प्लॅटफॉर्मने एक जाहिरात प्रदर्शित केली आहे. या जाहिरातीतून या प्लॅटफॉर्मच्या स्थापनेमागील मूळ भावना व क्लासिक सिनेमातील प्रत्येक क्षण जिवंत करण्याचे प्रयत्न अधोरेखित करण्यात आले आहेत. 'अल्ट्रा प्ले' या प्लॅटफॉर्मवर केवळ हिंदी कंटेन्टवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कंटेन्टची गर्दी नसल्याने प्रेक्षकांना निवड करणे सोपे जाते. या वाटेवर पुढे जाताना या प्लॅटफॉर्मवर नवीन हिंदी कंटेन्ट पाहायला मिळेल. यात वेब सीरिज आणि फिल्म्सचा समावेश असेल. या कंटेन्टची निर्मिती अल्ट्रातर्फे तसेच इतर प्रोडक्शन हाउसेसच्या सहयोगाने करण्यात येईल.
'अल्ट्रा गाने' हा व्हिडिओच्या स्वरुपातील गाण्यांचा भारतातील पहिला एक्स्क्लुझिव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. १९४० पासून आतापर्यंतच्या ४००० हून अधिक सदाबहार गाण्यांचे स्ट्रीमिंग करण्यात येत आहे.
'देख के सुनो' ही त्यांची टॅगलाइन असून या प्लॅटफॉर्मवर 'बाबूजी धीरे चलना', 'रूप तेरा मस्ताना' आणि अशा अनेक लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. या माध्यमातून प्रेक्षकांना समृद्ध करणारा अनुभव मिळतो. आजही, प्रेक्षकांशी थेट जोडणारी आणि भावनांना साद घालणारी ही गाणी अजूनही तितकीच आकर्षित करतात. 'अल्ट्रा गाने' या प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला दोन नवीन ओरिजिनल हिंदी गाणी स्ट्रीम करण्यात येतील .