Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"संपणार नाही प्रेम कहाणी" म्हणत 'राजा राणी' चित्रपटाचा टिझर समोर, उत्सुकता शिगेला*

*"संपणार नाही प्रेम कहाणी" म्हणत 'राजा राणी' चित्रपटाचा टिझर समोर, उत्सुकता शिगेला* *एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पाखरांची कहाणी 'राजा राणी' चित्रपटातून उलगडणार १८ ऑक्टोबरला जवळच्या सिनेमागृहात*
*'राजा राणी' चित्रपटात गोलीगत सूरज चव्हाणची लक्षवेधी भूमिका, टिझरमध्ये दिसली झलक* "संपणार नाही प्रेम कहानी" म्हणत खरंच ते दोघं दुरावतील का?, की पुन्हा एकत्र येतील? याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे. हो कारण नुकताच 'राजा राणी' चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय आणि या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. जिवापाड प्रेम करणारे दोन जिवलग कायम एकत्र पाहायला मिळाले मात्र त्या दोघांमध्ये असं काय होतं ज्याने त्यांच्या नात्यात दुरावा येतो?. बरं हा दुरावा चित्रपटात संपलेला पाहायला मिळणार की एकमेकांचा जीव घेणार हे सारं पाहणं रंजक ठरणार असल्याचे दिसत आहे.
टिझर पाहून तर सत्य घटनेवर आधारित असलेल्या या प्रेम कहाणीचा शेवट नक्की कसा असणार याची उत्सुकता आता साऱ्यांमध्येच लागून राहिली आहे. प्रियकर आणि प्रेयसीचा गावरान तडका असलेला रोमँटिक अंदाजही पाहणं टिझरमध्ये लक्षवेधी ठरतोय. शिवाय टिझरमध्ये खेडेगावात केलेलं चित्रीकरणही पाहायला मिळतंय. एकूणच हा टिझर पाहून 'राजा राणी' चित्रपट पाहण्यासाठी साऱ्यांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळत आहेत. टिझरमधील मुख्य नायक रोहन पाटील व नायिका वैष्णवी शिंदे यांचा रोमँटिक अंदाज अधिक भावला. याशिवाय या चित्रपटात 'बिग बॉस मराठी' फेम गोलीगत सूरज चव्हाण हा रोहनच्या मित्राच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे.
संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा 'राजा राणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.