*'मुलगी पसंत आहे' मालिकेत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची धमाकेदार एन्ट्री, झळकणार 'या' भूमिकेत*
September 25, 2024
0
*'मुलगी पसंत आहे' मालिकेत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची धमाकेदार एन्ट्री, झळकणार 'या' भूमिकेत*
'सन मराठी' वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. अशातच 'मुलगी पसंत आहे' या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आता या मालिकेत प्रिया बेर्डे यांच्या धमाकेदार एन्ट्रीने मलिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता प्रिया बेर्डे 'मुलगी पसंत आहे' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. शकुंतला डोंगरे असे या भूमिकेचे नाव असून त्या यशोधराच्या नणंदेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेत यशोधराला टक्कर देण्यासाठी शकुंतला सज्ज झाली आहे.
येणाऱ्या भागात तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे यशोधरा एका मीटिंगसाठी जायला निघते तिथे जायला तिला उशीर होतो. ती मीटिंग रूम मध्ये पोहोचते आणि समोर खुर्चीवर शकुंतलाला पाहून शॉक होते. शकुंतलाच्या एन्ट्रीमुळे यशोधराला धक्का बसतो. सरनाईकांच्या घरात शकुंतला येणार का? यशोधरासोबत शकुंतलाचे नाते संबंध कसे असणार? शकुंतलाच्या येण्यामुळे यशोधराच्या आयुष्यात नक्की कोणता बदल होणार? शकुंतलाच्या येण्यामुळे मालिकेत मोठं रंजक वळण येणार आहे.
*आता मालिकेत नक्की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'मुलगी पसंत आहे' सोम. ते शनि. सायंकाळी ७ वाजता फक्त आपल्या 'सन मराठी'वर.*