Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"माझी सावलीसाठी निवड होईल याची मला आशाच नव्हती"- प्राप्ती रेडकर

*"माझी सावलीसाठी निवड होईल याची मला आशाच नव्हती"- प्राप्ती रेडकर* *‘सावळ्याची जणू सावली* ’ मालिकेत अभिनेत्री *प्राप्ती रेडकर* , सावलीची भूमिका साकारणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्राप्तीने बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला. *"माझ्या भूमिकेचं नाव सावली आहे. तिला गायनाची प्रचंड आवड आहे. तिचे बाबा तिला लहानपणा पासून म्हणायचे की सावलीच गाणं म्हणजे १०० नंबरी सोनं.* ती खूप समंजस आणि समजूतदार आहे, कमी वयात तिच्यावर जबाबदाऱ्या आल्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेण्याचं तिचं व्यक्तिमत्व आहे. सावली विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे ती विठ्ठलासाठी काहीही करू शकते. सावलीसाठी पांडुरंग हा तिचा जिवलग मित्र आहे. तिचा रंग सावळा असल्यामुळे सगळे तिचा तिरस्कार करतात पण ती कधीच कोणाचं वाईट चिंतत नाही, सगळ्यांची मदत करायला धावून जाते. सावलीच कुटुंब वारकरी संप्रदायातील आहे, तिच्या बाबांचं नाव आहे एकनाथ, आईच नाव आहे कानू, तिला दोन भाऊ आहेत. मोठ्या भावाचं नाव सुखदेव त्याच्या बायकोच नाव आहे जयंती. सावलीची वहिनी जयंती तिचा खूप तिरस्कार करते. तिच्या लहान भावाचं नाव अप्पू आहे ज्याला हृदयाचा आजार आहे. असा सावलीचा परिवार आहे. माझी सावलीसाठी निवड झाली याचा किस्सा सांगायचं झाला तर असा कि मी याआधी एक मालिका करत होते तेव्हाच मला ‘सावळ्याची जणू सावली’ साठी कॉल आला होता. तर मी थोडी विचारात होते की काय करायचं. मी ऑडिशन देण्यासाठी गेले. सावलीच्या ऑडिशनला मी सावली सारखा लुक केला होता, त्यांना माझ्या पहिल्या टेक मधेच ऑडिशन खूप आवडलं. पण मी काही आशा ठेवली नव्हती की मला ही भूमिका मिळेलच. मला दुसऱ्यांदा कॉल आला दुसऱ्या ऑडिशनसाठी ते ही त्यांना आवडलं त्या नंतर एक दिवस लुक टेस्टसाठी कॉल आला. खूप प्रयोग केले सावलीच्या लूकसाठी त्यानंतर मला माझी निवड झाल्याचं कळवण्यात आलं. मला विश्वासच बसत नव्हता की खरंच माझी निवड झाली आहे. मी देवाचे आभार मानले, आई-बाबांना सांगितले आणि आम्ही ठरवले होते की जो पर्यंत प्रोमो नाही येत तो पर्यंत हे आपल्यातच ठेवायचं. मला अजून लक्ष्यात आहे की मला आमचे क्रिएटिव्ह आहेत त्यांनी मला प्रोमोचा फर्स्ट कट दाखवला होता आणि मी स्तब्ध झाले होते इतका उत्कृष्ट प्रोमो झाला होता. डिरेक्शन, शूट सगळ्याच गोष्टी अप्रतिम झाल्या होत्या. जेव्हा प्रोमो सोशल मीडियावर आला तेव्हा मी अक्षरश रडले. *मला तो क्षण अजूनही लक्षात आहे मी प्रवासात होते आणि ट्रेन मध्ये मी फोनवर प्रोमो पहिला, नंतर आई-बाबांना कॉल केला की घरी आल्यावर सरप्राईझ आहे. माझे आई-बाबा सतत तो प्रोमो रात्री उशिरा पर्यंत बघत होते.* मला सर्वांचे कॉल आले. माझी खास मैत्रीण आहे आशु ती मला बोलली होती की प्राप्ती तुझी निवड झाली की मी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन द्यन्यवाद म्हणेन आणि तिने लगेच ते केले. इतकी सुंदर लोक माझ्या आयुष्यात आहेत. माझ्यासाठी प्रार्थना करत असतात म्हणून इतक्या छान गोष्टी घडत राहतात. मालिकेसाठी आम्ही आऊटडोअर लोकेशनवर ही शूट केले, तो शूटचा अनुभव कमाल होता. आम्ही दोन ठिकाणी शूट केलं. प्रोमो शूट सातारा वाई मध्ये लिंब नावाचं गाव आहे तिथे शूट केला. इतकं सुंदर ते गाव आहे की शब्दात व्यक्त नाही करू शकत. मालिकेचे काही सीन्स आम्ही भोर मध्ये शूट केलं आहेत. भोर म्हणजे स्वर्ग आहे. मला कोणाला सांगायची गरजच नाही की भोर किती सुंदर आहे. आम्ही पावसाळ्यात शूट केले तर खूप सुंदर निसर्गमय वातावरण होते.
मी आई-बाबांना मिस केलं पण पूर्ण टीम एकत्र असते आऊटडोअर साठी तर ती एक वेगळीच मज्जा असते. माझं सर्वात जास्त सावलीची फॅमिली आहे त्यांच्यासोबत जास्त शूट झालंय आतापर्यंत. मी सेटवर सगळ्यात लहान आहे तर माझे खूप लाड होतात. आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसतो सगळे डब्बे आणतात घरातून. जर कधी घरी जायला उशीर झाला तर गौरी ताई जी जयंतीची भूमिका साकारत आहे ती मला घरी सोडायला येते. मला मालिकेत गाणं शिकवते ती माझी माई म्हणजे मेघा धडे, सुप्रित दादा सर्वांशी माझं छान नातं आहे. ताराची भूमिका करतेय ती भाग्यश्री दळवी, माझी खूप चांगली मैत्रीण झाली आहे. साईंकित ही खूप सपोर्टिव्ह आहे. आमची टेक्निशियनची टीम ही खूप मस्त आहे. माझ्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात मी ६-७ वर्षाची होते तेव्हा झाली. एक फोटोग्राफर होता त्याला त्याचा पोर्टफोलिओ बनवायचा होता. तेव्हा तो माझ्या घरच्यांना म्हणाला की माझी स्माईल चांगली आहे तर आपण हीच फोटोशूट करूया अशी माझ्या ऍक्टिंग करिअरची सुरवात झाली. त्या नंतर मराठी आणि हिंदी मालिका केल्या, जाहिराती केल्या. आता मी फक्त २० वर्षाची आहे आणि खूप काम करायचे आहे. मला अभिनय, डांस, आणि खेळाची आवड आहे. मी लहानपणा पासून क्रिकेट खेळतेय. मी किक बॉक्सिंग मध्ये नॅशनल लेव्हलवर गोल्ड मेडलिस्ट आहे. कराटे आणि मार्शियलआर्टस्चे अनेक प्रकार करते. मी खवय्ये आहे मला खणायची आणि स्विमिग ची आवड आहे. जर मी अभिनय क्षेत्रात नसली असती तर स्पोर्ट्स क्षेत्रात असते. *मी सर्व प्रेक्षकांना एवढाच सांगीन कि सावलीला खूप प्रेम द्या आणि फक्त सावलीला नाही तर मालिकेच्या प्रत्येक भूमकेवर प्रेमकरा आणि आम्ही तुमच्या मनोरंजनामध्ये काही कमी ठेवणार नाही. तुम्हाला भेटायला येतेय ‘सावळ्याची जणू सावली’ १६ सप्टेंबरपासून रोज संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.”*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.