*शिवा-आशूची चाळीतली पहिली रात्र कशी असणार.*
'शिवा' मालिकेत शिवा आणि आशुचं चाळीत धुमधडाक्यात स्वागत होत, त्यांना घरी आलेलं पाहून सगळ्यांना खूप आनंद होतोय. पाना गँग शिवा आणि रॉकी यांच्यात भेट घडवून आणतात (रॉकी म्हणजे तो मुलगा ज्याला शिवाने त्याचा पडत्या काळात शिक्षणासाठी मदत केली होती) आणि शिवाला सरप्राईज देतात. आशु शिवाशी चांगलं वागतो जे पाहून सगळ्यांना छान वाटतं. जगदीश म्हणजेच शिवाचा काका आणि त्याची पत्नी शिवाच्या घरी येतात. पाना गँग शिवा आणि आशूला विविध खेळ खेळायला लावतात. तर दुसरीकडे चंदन दिव्याला सांगतो की त्याला आजोबांना भेटायला गावी जायचे आहे. चंदन दिव्याला भाजीच्या टेम्पोत बसवून गावी घेऊन जातो.
रामभाऊंनी सर्वांसमोर घोषणा करतात की सर्वांना शिवाच्या घरी जेवायला जायचे आहे. सीताई रामभाऊंना सांगते की आशुला शिवामुळे दारूची सवय लागलेय. पाना गँगच्या मदतीने, बाई आजी, शिवा आणि आशूच्या रूमला सजवायची योजना आखतात. आशुला रात्रभर झोप येत नाही. असं काय होत ज्यांनी आशुची झोप उडते ? शिवा साडीत पहिल्यांदाच गॅरेजमध्ये येते. पण आशु सकाळ पासून गायब आहे हे शिवा आणि सर्वांच्या लक्षात येते. आशू बेपत्ता झालाय हे समजल्यावर सर्वांनाच काळजी वाटते. कुठे असेल आशु ? *कशी होती आशु आणि शिवाची चाळीतली पहिली रात्र ? बघायला विसरू नका 'शिवा' सोमवार ते शुक्रवार रात्री ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*