*१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य*
August 26, 2024
0
*१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य*
काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ सेल्फी काढताना दिसत आहेत. सेल्फीत हसणारे चेहरे दिसत असतानाच मागच्या चेहऱ्यांमध्ये मात्र काही रहस्ये दडलेली दिसत आहेत. हे चेहरे काही वेगळंच सांगत आहेत. त्यामुळे ‘लाईक आणि सबस्क्राईब’मागे हे काय गुपित आहे. हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, ‘’ लाईक आणि सबस्क्राईब हा दैनंदिन शब्द झाला आहे. रोजच्या जीवनात हा शब्द सर्रास ऐकला जातो आणि याच शब्दांभोवती फिरणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा एक रहस्यमय चित्रपट असून प्रेक्षकांना निश्चितच खुर्चीला खिळवून ठेवेल. येत्या १८ ॲाक्टोबरला रोहित चौहान कोण आहे, याचा उलगडा होईल.’’