*सूर्या, तुळजासाठी आगीत उडी टाकणार !*
तुळजा सूर्याला सांगते की तिला सत्यजितशी लग्न करायचे नाही. तुळजाला आवडणारा मुलगा सत्यजित नाही तर सिद्धार्थ आहे हे कळल्यानंतर, सूर्या तुळजाला त्या दोघांचं लग्न लावून देण्याचे वचन देतो. दुसरीकडे तुळजाच्या घरी लग्नाची तयारी आहे. हे सर्व माहित असताना देखील सूर्या, तुळजाला प्रत्येक टप्प्यावर मदत करतोय. एक दिवस, सूर्या घरी खोटं बोलून तुळजाला सिद्धार्थला भेटण्यासाठी एका आलिशान हॉटेलमध्ये घेऊन जातो. सूर्या आणि तुळजाला एकत्र जाताना सत्यजितची माणसं पाहतात आणि त्यांचा पाठलाग करू लागतात. ज्यामुळे सूर्या आणि तुळजा यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज सत्यजितचा होतो. सत्यजित आणि त्याची माणसं एका यात्रेदरम्यान सूर्याला मारण्याचा प्लान बनवतात. ते एका खोलीत तेल ओतून त्याला जिवेमारण्याचा प्लान करतात, पण त्या खोलीत तुळजा अडकते.
तुळजाच्या जीवाला धोकातर नसेल ? *सूर्याला मारण्याचा सत्यजितचा प्लान यशस्वी होणार का ? जालिंदर समोर सत्यजित सूर्या-तुळजाच प्रकरण उलगडेल तेव्हा त्याचे परिणाम काय होतील? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका 'लाखात एक आमचा दादा' दररोज रात्री ८:३० वा. फक्त*