Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अभिनेता सोहम कुरूलकर याच्या ‘स्वीट टॉक्स पॉडकास्ट’ने पार केला ५० हजार सबस्क्राइबर्सचा टप्पा*

*अभिनेता सोहम कुरूलकर याच्या ‘स्वीट टॉक्स पॉडकास्ट’ने पार केला ५० हजार सबस्क्राइबर्सचा टप्पा* - मराठमोळ्या सोहमने केली ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्यासोबत अध्यात्मिक बातचीत
मुंबई - आज काल आपण सोशल मीडियावर बरेच पॉडकास्ट पाहतो. ब-याच विषयांवरच्या चर्चा, माहिती, किस्से आपण ऐकतो. परंतु पुरातन हिंदू मंदिरे, श्लोक, मंत्र, अध्यात्मिक शक्ती, भक्ती असे सकारात्मक व मानसिक स्वास्थ्य निर्माण करणारे पॉडकास्ट फारच कमी आहेत. त्यात मराठी भाषेतील पॉडकास्ट अगदी हातावर मोजण्या इतपत आहेत. नुकतचं मराठमोळा कलाकार सोहम कुरूलकर याने स्वीट टॉक नावाचा पॉडकास्ट सुरू केला. काही दिवसांतच त्याच्या पॉडकास्टला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. व नुकतेच त्याच्या कॉसमोस्टार मीडिया या युट्यूब चॅनेलने ५० हजार सबस्क्राइबर्सचा टप्पा पार केला.
सोहम कुरूलकर स्वीट टॉक पॉडकास्ट विषयी सांगतो, “लहानपणापासून मला मराठी रंगभूमी, चित्रपट, मीडिया क्षेत्राची आवड होती. मी नाटकांमध्ये याआधी काम केलं आहे. मराठी चित्रपट गर्लफ्रेंड व बॉलिवूडच्या बागी २ आणि केसरी या चित्रपटांमध्ये मी अभिनय केला आहे. बऱ्याच मराठी कलाकारांचं सोशल मीडिया मी manage करायचो, त्यानंतर मी सोशल मीडियावर रिअल हिट, बिअर बायसेप्स यांचे पॉडकास्ट बघायचो. पण त्यांचे पॉडकास्ट हिंदी भाषेत होते. मग मला कल्पना सुचली की आपण आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठी भाषेत पॉडकास्ट सुरू करावा. म्हणून मी स्वीट टॉक हा पॉडकास्ट सुरू केला. आणि ६ महिन्यातचं या पॉडकास्टने ५० हजार सबस्क्राइबर्स पूर्ण झाले.”
पुढे तो म्हणतो, “याचे संपूर्ण श्रेय हे मी माझ्या प्रेक्षकांना देतो. त्यांनी मला कमेंट्सद्वारे वेळोवेळी योग्य त्या सूचना दिल्या. माझ्या व्हिडीओजना खूप प्रेम दिलं. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच मी लवकरचं मराठी सिनेसृष्टीतील काही वरिष्ठ कलाकारांना माझ्या पॉडकास्टवर आमंत्रित करणार आहे व त्यांच्यासोबत अध्यात्मिक पॉडकास्ट करणार आहे.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.