Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*हृतिक रोशनच्या साथीने मोबिल™ चा वितरक सोहळा संपन्न*

*हृतिक रोशनच्या साथीने मोबिल™ चा वितरक सोहळा संपन्न* मुंबई, भारत, ऑगस्ट २०२४: ऑटोमोटिव्ह लुब्रिकन्ट्सच्या क्षेत्रातील एक अग्रेसर नाव मोबिल™ ने आपल्या नव्याकोऱ्या बी२सी आणि बी२बी मोहिमांच्या शुभारंभानिमित्त मुंबईमध्ये वितरकांसाठीचा एक भव्य सोहळा आयोजित केला. सुपरस्टार आणि Mobil™ चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर हृतिक रोशन यांची उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये नवसंकल्पना राबविण्याप्रती व सर्वोत्कृष्टता साध्य करण्याप्रती मोबिलने सतत जपलेल्या बांधितलकीवर प्रकाशझोत टाकण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख वितरक आणि अधिकृत रिसेलर्स एकत्र आले व त्यांनी ग्राहक अनुभवामध्ये सुधारणा करण्याचे तसेच कंपनीच्या वाढीला चालना देण्याचे लक्ष्य समोर ठेवून राबविण्यात येत असलेले मोबिलचे नवीनतम उपक्रम प्रदर्शित केले. हृतिक रोशन यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला. यावेळी त्यांनी उपस्थितांबरोबर संवाद साधला, मोबिल कुटुंबाचा भाग असल्याबद्दलच्या आपल्या उत्साहाबद्दल सांगितले आणि कामगिरी व जबाबदारी यांच्याप्रती ब्रॅण्डची समर्पितता अधोरेखित केली. मोबिल™ने विविध प्रकारचे ग्राहक व व्यावसायिक कंपन्या यांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोबिल जाहिरात मोहिमेच्या माध्यमातून नवीन मोबिलसुपर एसयूव्ही प्रो आणि फिल बाजारात आणले आहे. नवीन मोबिल सुपर एसयूव्ही Pro फिल्ममध्ये वापराने होणाऱ्या झिजेपसून दुप्पट सुरक्षा देणाऱ्या व इंजिनाच्या दीर्घायुष्यासाठी असलेल्या हीट अॅक्टिव्हेटेड मॉलेक्युल तंत्रज्ञानाचे ठऴकपणे चित्रण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर फिलसाठीच्या जाहिरातीमध्ये उपयोजनातील असाधारण कुशलत्वावर भर देण्यात आला आहे, ज्याची शिफारस ३५००० ओईएमनी आपल्या समर्थनाद्वारे केली आहे, जे ओईएमआणि इतर व्यवसायांना अचूक उपाययोजना पुरविते. हृतिक रोशन यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले: "मोबिल परिवाराबरोबर घालवलेल्या या वेळेमुळे माझी संध्याकाळ सार्थकी लागली आणि यामुळे ब्रॅण्डवरचा माझा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. आपल्या ग्राहकांना आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम उत्पादने आणि उपाययोजना पुरविण्याप्रती मोबिलची बांधिलकी खरोखरीच प्रेरणादायी आहे आणि सर्वोत्कृष्टता साध्य करण्याची त्यांची उर्मी टीमच्या उपस्थितीमधूनही जाणवत होती.”
एक्झॉन लुब्रिकन्ट्स प्रा. लि. चे सीईओ विपिन राणा म्हणाले, "मुंबईमध्ये हा कार्यक्रम साजरा करताना आणि आमच्या नव्या बी२सी व बी२बी मोहिमांच्या सोहळ्यामध्ये लाभलेल्या हृतिक रोशन यांच्या उपस्थितीमुळे आम्ही भारावून गेलो आहोत. नवसंकल्पना आणि सर्वोत्कृष्टता यांच्याप्रती आमची बांधिलकी आमच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करणाऱ्या मोबिल उत्पादनांमध्ये आणि सेवासुविधांमध्ये प्रतिबिंबित होते. आमचे प्रमुख लाभार्थी म्हणून देशाच्या विविध भागांतून आलेल्या २०० हून अधिक लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. आमच्या ग्राहकांना रस्त्यावर गाडी चालवताना किंवा आपले व्यवसाय चालविताना, ते कुठेही असले तरीही आत्मविश्वास व विश्वासार्हता पुरविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. या कार्यक्रमामुळे आपल्या वितरकांना पाठबळ देण्याप्रती ऑटोमोटिव्ह कामगिरीच्या भविष्याला चालना देण्याप्रती आमची समर्पितता अधोरेखित झाली आहे." उपस्थितांवर दीर्घकाळासाठी छाप सोडणे, मोबिलच्या नव्या संकल्पना आणि ग्राहक व व्यावसायिक कंपन्या दोघांप्रतीही आपली बांधिलकी अधोरेखित करणे हे मुंबईतील या कार्यक्रमाचे लक्ष्य होते. मोबिल™ आपल्या उत्पादनांच्या व उपाययोजनांच्या साथीने वाढ साधत राहील आणि पुढे जात आहे आणि कामगिरी व विश्वासार्हतेला ऊर्जा पुरविण्याप्रती कटिबद्ध आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.