Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चारुचं खोटं सर्वांसमोर येणार, ओवी करणार मोठा खुलासा

*चारुचं खोटं सर्वांसमोर येणार, ओवी करणार मोठा खुलासा !* ' सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निकीता नीरज आणि निशीच्या नात्यात तणाव निर्माण करतेय. मुंबईतील एका हॉटेलमधून एक कागद सापडतो, तो कागद ओवीच्या हाती लागतो. ओवी विजयला मुंबईत माहिती गोळा करण्यास सांगते आणि लॅब असिस्टंट कडून खरे रिपोर्ट्स मागवते.
तर दुसरीकडे श्रीनु आणि चारू यांचा हळदी समारंभ सुरु असताना ओवी पुरावे गोळा करण्याच्या कामात गुंतलेली आहे. ओवी आपल्या सापळ्यात डॉक्टरला अडकवते आणि ती श्रीनु आणि चारूच्या लग्नाला हजर होते. ओवी डॉक्टरला घेऊन येते, तर विजय हॉटेल मॅनेजरला घेऊन येतो, ज्यामुळे चारुचं खोटं सर्वांसमोर येत. आता चारू आणखी काय नवीन डाव टाकेल? *ओवी आणि श्रीनु परत एकत्र येतील का?* *श्रीनु समोर चारूच सत्य आल्यावर तो काय करणार हे सगळं पाहायला विसरू नका
' सारं काही तिच्यासाठी' सोमवार ते शनिवार रात्री ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.