*हनिमूनच्या निमित्ताने आकाश देणार वसूला एक खास सरप्राईझ !*
August 17, 2024
0
*हनिमूनच्या निमित्ताने आकाश देणार वसूला एक खास सरप्राईझ !*
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसू आणि बनीच्या नात्यात दुरावा दर क्षणी वाढत चालला आहे. वसुला दुःखी पाहून आकाश तिच्यासाठी काही तरी खास करायचं म्हणून घरात पाणीपुरी पार्टीचे आयोजन करतो, पण वसुला बनीसोबतच्या तिच्या पाणीपुरीच्या आठवणी आठवतात. ही पाणीपुरी पार्टी घरात चालू असतानाच जयश्री बनीला फोन करून त्याच्या मनात गैरसमज निर्माण करते की त्याच्या अनुपस्थितीत घरात सगळे पार्टीचा आनंद घेत आहेत. जयश्री फोनवर बोलत असताना वसु त्यांना पकडते. वसू बनीला कॉल करून वचन देते की ती दुसऱ्या दिवशी त्याला भेटेल. बनी वसूला भेटण्यास उत्सुक असताना जयश्री काहीतरी कारस्थान करून वसूला थांबवते. बनी वसूची वाट पाहत राहतो आणि ती न आल्याने खूप दुःखी होतो.
बनी एका मित्राच्या मदतीने रात्रीच्या वेळी वॉर्डनपासून लपून त्याच्या वडिलांना शोधण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट करतो. इकडे घरी जयश्री वसूवर ठाकूरांच्या वारसासाठी दबाव टाकतेय. दुसऱ्यादिवशी आकाश घोषणा करतो की तो वसूला घेऊन हनिमूनला जात आहे, हे ऐकून वसूला धक्का बसतो. या हनीमूनच्या निमित्ताने आकाश कडून वसुला काय खास सरप्राईझ मिळणार ? हॉस्टेल मध्ये बनी आईच्या वाढदिवसासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवतो आहे, पण हे ग्रीटिंग कार्ड वसुपर्यंत पोहोचेल ? बनी वसूची भेट होऊ शकेल का ? जयश्रीच वारस मिळण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? या सर्व प्रश्नाच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका *'पुन्हा कर्तव्य आहे' चा महाएपिसोड १८ ऑगस्ट रात्री ९:३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.*