Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' चा टीझर प्रदर्शित;

*दिपक राणे फिल्म्स निर्मित 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' चा टीझर प्रदर्शित; शिवानी सुर्वे, कवीश शेट्टी, मेघा शेट्टी प्रेक्षकांना घेऊन जाणार एका वेगळ्याच विश्वात* *मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीचं दमदार Collaboration; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चा टीझर पाहाच* *दिपक राणे फिल्म्स निर्मित, मराठी आणि कन्नडा सिनेमा 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' एक नवा cinematic अनुभव; पाहा सिनेमाचा टीझर*
काही महिन्यांपूर्वी 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या मराठी सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. या सिनेमाचा लूक पाहून मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता की हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? विशेष म्हणजे, मराठी आणि कन्नडा सिनेमाचं कोलॅबोरेशन म्हणजे 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' हा सिनेमा. दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, आणि रमेश कोठारी निर्मित 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात दाखवलेल्या सीन्सनी, कलाकारांच्या अभिनयाच्या झलकनी, थरारक ऍक्शन सिक्वेन्सेसनी आणि प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. हा सिनेमा काहीतरी वेगळा आणि अधिक रोमांचक दिसतोय. मराठी सिनेसृष्टीने आजवर विविध विषय सखोल विचार करून हाताळले आहेत, मात्र हा सिनेमा एका नव्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या शैलीतून सादर करण्यात आलेला आहे. ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे हे विविध जॉनरमधील सिनेमांची निर्मिती करत प्रेक्षकांना खास अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा नेहमीच असा उद्देश असतो की प्रेक्षकांनी अडीच ते तीन तास सिनेमागृहात येऊन स्वतःसाठी वेळ काढावा, रिलॅक्स व्हावे आणि मनोरंजनाचा आनंद घ्यावा. त्यामुळे त्यांनी नेहमीच अशा सिनेमांची निवड केली आहे, जे प्रेक्षकांना आवडतील. आता त्यांनी एक नवं पाऊल पुढे टाकत एक नवीन विषय हाताळला आहे. या वेळी त्यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी एक असा सिनेमा तयार केला आहे, जो कन्नडा सिनेमासोबत कोलॅबोरेट करून बनवला गेला आहे. हा सिनेमा कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या ६ भाषांमध्ये पॅन इंडिया रिलीज होणार आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमात मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर, साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवीश शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार एकाच सिनेमात एकत्र येऊन ज्या ताकदीने हे पात्र साकारणार आहेत, ते प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.