धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त "धर्मवीर - २" चं नव गाणं लाँच
August 26, 2024
0
*धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त "धर्मवीर - २" चं नव गाणं लाँच*
*सुप्रसिद्ध बॉलिवुड गायक सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजातील "असा हा धर्मवीर...."*
*जनकल्याणा ,अखंड झटला, उभी सेना अभिमानी पाठीशी त्याच्या गर्जत जय भवानी...*
*"धर्मवीर -२" २७ सप्टेंबरला मराठी, हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार*
हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आज पुण्यतिथीचे औचित्य साधून "धर्मवीर २" या आगामी चित्रपटातील "असा हा धर्मवीर...." हे गाणं आज सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. बहुप्रतीक्षित "धर्मवीर - २" चित्रपटाच्या ट्रेलरमुळे रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
दिघे साहेबांची वेगवेगळी रुपं दाखवणारं, प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारं असे हे गाणं आहे. विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या ह्या गीताला मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अविनाश - विश्वजीत या जोडगोळीने या गीताला संगीत दिले असून सुप्रसिद्ध बॉलिवुड गायक सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात हे गाण रेकॉर्ड करण्यात आले आहे.
"धर्मवीर -२" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली होती. त्यामुळे "धर्मवीर - २" मधील गाण्यांविषयीही कमालीची उत्सुकता आहे.
सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब या गाण्यात दिसतात. या गाण्यातून साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडते. त्यामुळे आता चित्रपटात साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली आहे याचे सर्वसामान्य लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.
*Song Link*
https://youtu.be/vuo-fT9_0ak?si=BJ5QocVUHf-Zi7pq