Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रघु ३५०' ऍक्शन चित्रपटाच्या ट्रेलरची हवा, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

*"सगळे दुरावले तरी ३५० कधीच साथ सोडणार नाही",
'रघु ३५०' ऍक्शन चित्रपटाच्या ट्रेलरची हवा, सोशल मीडियावर तुफान व्हायरल* *'रघु ३५०' चित्रपटाचा Action Packed ट्रेलर प्रदर्शित, प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार* *'रघु ३५०' चित्रपटाच्या ट्रेलरची हवा, ६ सप्टेंबरपासून जवळच्या चित्रपटगृहात*
मारामारी, ऍक्शन, न्यायासाठीची लढाई आणि मिळणार यश हे सारं मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरतं. आजवर असे अनेक चित्रपट आले ज्यात न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली. यांत भर घालत सोशल मिडियावर एका चित्रपटाच्या ट्रेलरने हवा केली आहे. हा चित्रपट म्हणजे 'रघु ३५०'. 'रघु ३५०' चित्रपटाच्या पोस्टरने, टिझरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. येत्या ६ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा टिझर पाहून साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रघु ३५० या चित्रपटाच्या २.३२ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. प्रेमासाठी, सत्तेसाठीची ही लढाई ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. चिन्मय उदगीरकर, विजय गीते आणि अदिती कांबळे यांचा लव्ह ट्रँगल ट्रेलरची उत्सुकता वाढवत आहे. नेमक कोणी कोणावर मात करत विजय मिळवला, सत्तेसाठी कोण बदललं, कोणाचा विजय झाला याची छोटीशी झलक ट्रेलरमधून पाहणं रंजक ठरत आहे. समोर आलेल्या या ट्रेलरमधील तुफान राड्यांवरुन प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार हे पात्र गुपित ठेवण्यात आलं आहे.
'सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'रघु ३५०' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर, विजय गीते, अदिती कांबळे, तानाजी गलगुंडे, संजय खापरे, शिवराज वाळवेकर, मिलिंद दास्ताने, रोहित आवळे, महिमा वाघमोडे, भरत शिंदे, रामभाऊ जगताप ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.
करण तांदळे यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी पेलवली आहे. तर चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरला चित्रपटात धुमाकूळ घालायला सज्ज होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.