दहीहंडीसाठी वस्तीत जायला शिवाची मदत कोण करणार?
August 21, 2024
0
*दहीहंडीसाठी वस्तीत जायला शिवाची मदत कोण करणार?*
रक्षाबंधन निमित्त शिवा जगदीशकाकाच्या मुलाला घरी बोलावते. इकडे पाना गँगही शिवाला राखी बांधते. कीर्ती आशूकडून रक्षाबंधनचे गिफ्ट म्हणून शिवाला घरापासून दूर ठेव असं म्हणते. रामभाऊ आणि सिताई गिरनार दर्शनाला निघुन जातात. लक्ष्मण आणि उर्मिला आशू आणि शिवाला एकत्र वेळ घालवता यावा म्हणून कीर्ती आणि सुहासला फार्महाऊसवर घेऊन येतात. आशू आणि शिवा दोघे मिळुन स्वयंपाक बनवतात.
शिवा आणि आशू सकाळी नाष्टा बनवत असताना सीताई आणि रामभाऊ येतात, आशूच्या हाताला भाजलेलं पाहून सिताई शिवावर ओरडते. शिवा आणि आशू मिळुन लक्ष्मण आणि उर्मिला यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन प्लॅन करतात. इकडे दहीहंडी जवळ येतेय, पण सिताई शिवाला दहीहंडीसाठी वस्तीत जायला नकार देते. शिवा गोपाळकाल्याच्या पूजेची तयारी एकटीच करते. पाना गँग शिवा दहीहंडीसाठी नसणार म्हणून उदास आहे. *आता शिवा या दहीहंडी उत्सवासाठी कशी पोहचणार ? आणि तिची मद्दत कोण करणार हे सगळं पाहायला विसरू नका 'शिवा' सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*