Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुम है किसी प्यार में’ मालिकेतील सावी-रजतच्या साखरपुडा सोहळ्याला सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक शानची खास उपस्थिती!

*‘गुम है किसी प्यार में’ मालिकेतील सावी-रजतच्या साखरपुडा सोहळ्याला सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक शानची खास उपस्थिती! गायक शानने कथन केला स्वानुभव!*
’स्टार प्लस’च्या ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेच्या वेधक कथानकामुळे या मालिकेला एक निष्ठावंत प्रेक्षकवर्ग लाभला आहे. कथानकाला अचानक मिळणारे वेगळे वळण आणि त्यात होत जाणारे बदल यांमुळे दर्शक ठरल्या वेळेस ही नाट्यमय मालिका पाहण्यासाठी त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर खिळलेले असतात. या मालिकेत हितेश भारद्वाज आणि भाविका शर्मा ही मुख्य पात्रे आहेत. हितेश भारद्वाज रजत ठक्करची व्यक्तिरेखा साकारत असून, सावीची भूमिका भाविका शर्मा वठवत आहे आणि अमायरा खुराना यांनी साएशा (साई)ची भूमिका साकारली आहे. ‘गुम है किसीके प्यार में’ मालिकेचा कथेचा पट सध्या सावी, रजत आणि सई यांच्याभोवती फिरत आहे. अखेर सावीने आणि रजतने सईच्या आनंदाकरता एकत्र येण्याचे मान्य केले आहे; साईवर त्यांच्या असलेल्या प्रेमापोटी हे दोघे एकत्र आले आहेत. १२ ऑगस्ट हा दुहेरी उत्सवाचा दिवस आहे. सावी-रजतच्या साखरपुड्याच्या सोहळ्यासोबतच, ‘साराज’च्या सर्व चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी आहे की, प्रसिद्ध बॉलीवूड गायक शान हा ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेतील सावी-रजतच्या साखरपुड्याच्या समारंभात सहभागी झालेला पाहायला मिळेल. सुरेल आवाजासाठी ओळखला जाणारा गायक शान हा सावी आणि रजतचा साखरपुडा सोहळा अधिक संस्मरणीय बनवण्याकरता या सोहळ्यात सहभागी होत आहे. सावी-रजतच्या साखरपुड्याचा आनंदी क्षण शानच्या मोहक व्यक्तिमत्वामुळे अधिक उजळून निघेल आणि शानच्या जादुई आवाजातील गाण्यांचे सादरीकरण दर्शकांना मंत्रमुग्ध करेल, यात शंकाच नाही. या सोहळ्यात गायक शानचे सहभागी होणे ही प्रेक्षकांकरता निश्चितच एक संगीतमय मेजवानी ठरणार आहे, जिथे त्यांची आवडती जोडी असलेल्या सावी-रजतसोबत या कार्यक्रमाचा खास पाहुणा असलेला शान आपल्या उपस्थितीने प्रेक्षकांची मने जिंकेल.
*गायक शान यांनी सांगितले, “स्टार प्लस वाहिनीवरील मालिका ‘गुम है किसीके प्यार में’त सहभागी होणे ही खरोखरच आनंददायी बाब आहे. सावी-रजतच्या नात्यात काहीशी गुंतागुंत आहे खरी, पण मला खात्री आहे की, मी त्यांच्या साखरपुडा सोहळ्यात सहभागी होऊन ही गुंतागुंत काहीशी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. सावी आणि रजतच्या साखरपुड्याच्या खास प्रसंगी मी ‘चांद सिफरिश’, ‘जब से तेरे नैना’ आणि ‘दिवानगी दिवानगी’ ही गाणी सादर करणार आहे. सावी-रजतचा साखरपुडा समारंभाचा एक भाग बनणे हा माझ्याकरता एक आनंददायी आणि मौजेचा अनुभव होता. ठक्कर आणि भोसले ही दोन्ही कुटुंबे छान आहेत आणि मी सावी-रजत यांना त्यांच्या नव्या नात्याच्या सुरुवातीकरता शुभेच्छा देतो. माझ्यासोबत ‘गुम है किसीके प्यार में’ ही मालिका पाहण्यासाठी आणि सावी-रजतच्या साखरपुडा सोहळ्याचा भाग होण्यासाठी प्रेक्षकांइतकाच मीही आतुर, आनंदी आणि उत्साही आहे.”* १२ ऑगस्ट रोजी रात्रौ ८ वाजता ‘स्टार प्लस’वर ‘गुम है किसीके प्यार में’ पाहायला विसरू नका. ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेची निर्मिती राजेश राम सिंग, पिया बाजपेयी, प्रदीप कुमार आणि शैका परवीन यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.