सन मराठीवर रंगणार खेळ मंगळागौरीचा,
August 29, 2024
0
*सन मराठीवर रंगणार खेळ मंगळागौरीचा, 'तुझी माझी जमली जोडी' आणि 'नवी जन्मेन मी' मालिकेत सई आणि स्वानंदीचा संघर्ष*
*सन मराठीवर सई आणि स्वानंदीच्या मंगळागौरीच्या खेळात खलनायिकांचा कट, 'तुझी माझी जमली जोडी' आणि 'नवी जन्मेन मी' मध्ये रंगणार नवा ट्विस्ट*
सन मराठीवर प्रेक्षकांना दोन जबरदस्त मालिकांमध्ये मंगळागौरीचे खेळ पाहायला मिळणार आहेत. 'तुझी माझी जमली जोडी' आणि 'नवी जन्मेन मी' या दोन मालिकांमध्ये रंगत असलेल्या या खास पर्वांनी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. या मालिकांमधील नायिका आणि खलनायिका यांच्यामध्ये होणारे संघर्ष आणि नात्यांचे गुंते, या खेळांमध्ये प्रेक्षकांना एक नवीन अनुभूती देणार आहेत.
*'तुझी माझी जमली जोडी'* मालिकेत भैरवी सईच्या मंगळागौर खेळात अडथळा आणते. खेळाच्या मधोमध ती सईला खाली पाडते. सई आपल्या आत्मविश्वासाने परत खेळायला लागते. पुढे, सई भैरवीला फुगडी खेळायला बोलावते, आणि भैरवी सईला परत पडणार का? की सईचा काही वेगळा डाव असेल? सईच्या ह्या निर्णयामागे काही रहस्य दडले आहे का? सईचे धैर्य आणि आत्मविश्वास यामुळे प्रेक्षकांच्या मनात तिची एक खास जागा तयार होईल हे नक्कीच दिसेल.
तसेच, *'नवी जन्मेन मी'* मालिकेत सरपोतदार मंगळागौर जाहीर करतात, आता मंगळागौर जाहीर करण्याचं काय कारण असेल ? मंगळागौरीच्या खेळात संचिता स्वानंदीला त्रास देण्यासाठी नक्कीच काही तरी प्रयत्न करणार. आता संचिता काही कारस्थान करणार की सरपोतदार कोणती खेळी खेळणार; हे पाहण्यास प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे.
*तर पाहायला विसरू नका मंगळागौरीचे विशेष भाग *नवी जन्मेन मी रात्री ७:३० वाजता आणि तुझी माझी जमली जोडी रात्री १०:३० वाजता फक्त सन मराठीवर.*