अमोलचं, अप्पी-अर्जुनला एकत्र पाहण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार ?
August 12, 2024
0
*अमोलचं, अप्पी-अर्जुनला एकत्र पाहण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार ?*
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सरकार आणि रुक्मीणीला घरी बोलावून रुपाली अप्पी आणि अर्जुनमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करते. रुपालीनेच मोना बनून सरकार आणि रुक्मीणीला फोन करून बोलावल्याचे सगळ्यांच्या समोर येते आणि त्यामुळे, रूपालीचा खरा चेहरा सर्वासमोर येतो. ते बघून विनायक, दिप्या आणि बापू रूपालीला अर्जुन-अप्पी मध्ये भांडण लावत असल्याच्या कारणावरून बोलतात. स्वप्निल रूपालीला ह्या वागण्यावरून तिला कानाखाली मारतो. तर अप्पी आणि अर्जुन रुपालीला घरातून काढून टाकतात. तेव्हा रुपाली अप्पीवर खार खाऊन एक शेवटचा डाव म्हणून ‘मनी मावशी’ला अप्पीच्या घरी पाठवयाचे ठरवते आणि दुसऱ्या दिवशी सगळे आसगावला फिरायला गेले असताना मनी मावशी अप्पीच्या घरी येते. मनी मावशी स्वतःचा लूक बदलून अप्पीच्या घरी येते आणि तेव्हा घरी असलेल्या मोनाला घरात नोकर हवा असल्याने ती नकळत मनी मावशीला कामाला ठेवते. घरचे आसगाव वरून आल्यावर मनी मावशीला कोणी ओळखत नाही म्हणून खुश होते. पण अप्पीने मात्र मनी मावशीला ओळखलंय आणि ते ती अर्जुनला सांगते. अर्जुन मनी मावशीला लगेच बाहेर काढायचं म्हणतो. पण अप्पी मनीला धडा शिकवण्यासाठी घरी ठेवून घेते आणि मनीला घरात कामाला लावते.
मनी अप्पी आणि अर्जुन मध्ये भांडण लावायचे आणि अमोलला त्रास द्यायचा प्रयत्न करते. पण ते सगळे प्रयत्न अप्पी हाणून पाडते आणि नागपंचमीच्या दिवशी अप्पी मुद्दाम घरातील नागाला म्हणजे मनी मावशीला दुध देऊन, तिचा पर्दाफाश करते. घरातील सगळे अप्पी, अर्जुन आणि अमोल आता एकत्र राहत असल्याने, देव दर्शनासाठी आणि फिरायला जाण्यासाठी मागे लागतात. अप्पी, अर्जुन आणि अमोल फिरायला गेले असताना मनी गाडीचा ब्रेक फेल करते ज्यांनी त्यांच्या गाडीचा ऍक्सीडेन्ट होते. *अर्जुन अमोलला वाचवतो पण अप्पी गाडीतच अडकते. अप्पीला अर्जुन वाचवू शकेल ? की अमोलाचं आपल्या आई-बाबांना एकत्र पाहायचं स्वप्न अपूर्ण राहील ? त्यासाठी बघायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर' दररोज संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*