*.....आणि सुरेशजी वाडकर यांनी दिलेला शब्द पाळला*
August 12, 2024
0
*.....आणि सुरेशजी वाडकर यांनी दिलेला शब्द पाळला*
*सुरेश वाडकर यांची वचनपूर्ती...*
*"मन हळवे.." गाण्यास सुरेश वाडकर आणि श्रावणी वागळे यांचा स्वरसाज*
सारेगमप लिटिल चॅम्प्सच पर्व नुकतेच काही महिन्यांपूर्वी संपलं. त्यात उपविजेती ठरलेली गुणी गायिका श्रावणी वागळे हीचं उत्तम गायन ऐकून स्पर्धेतील महागुरू सुरेश वाडकर यांनी तिला एक वचन दिल होत. ते वचन अस होत की मी स्वतः श्रावणी बरोबर एक नवीन गाणं रिकॉर्ड करीन. बोलल्याप्रमाणे सुरेशजी यांनी दिलेला शब्द पाळला आणि "मन हळवे..." हे गीत रेकॉर्ड करून नुकतेच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले
अनेकदा रिॲलिटी शोमध्ये अनेक मोठी लोक स्पर्धकांची गाणी ऐकून अशी वचनं देतात परंतु ती काही वेळा पूर्णत्वास येत नाहीत. परंतु सुरेशजीनी स्वतःहून दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सारेगमप विजेता आणि सध्या सारेगमपचा संगीत संयोजक आणि मार्गदर्शक असलेला गायक आणि संगीतकार अनिरूद्ध जोशी यानी संगीतबद्ध केलेल्या "मन हळवे.." या गाण्यास सुरेश वाडकर आणि श्रावणी वागळे यांनी आवाज दिला आहे तर गाण्याचे शब्द ऋचा मुळे यांचे आहेत.
गाण्यामध्ये अक्षय आचार्य यानी संगीत संयोजन केले असून, प्रसाद पाध्ये यांनी तबला, वरद कठापुरकर यानी बासरी तर हर्ष भावसार यानी सक्सोफोन वादन केले आहे. हे गाणं नुकतंच आजीवसान च्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिध्द झाले असून गाण्यास रसिकांची पसंती मिळते आहे.
*Song Link*
https://youtu.be/hqr2qGwLj5A?si=KDdLJRRSpYJzJnQy