Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"मुंबईच्या पावसातला तो प्रसंग कधीच नाही विसरू शकणार"- दक्षता जोईल*





*"मुंबईच्या पावसातला तो प्रसंग कधीच नाही विसरू शकणार"- दक्षता जोईल*




पाऊस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळा अनुभव देतो कोणासाठी तो गोड आठवणींचा साठा देऊन जातो तर कोणाला तो काही भयानक अनुभव देतो. अश्याच काहीश्या *पावसाळ्यातल्या आठवणी  दक्षता जोईलने सांगितल्या* , "पावसाळा मला प्रचंड आवडतो असं नाही, मला हिवाळा आवडतो. पावसाळा का नाही आवडत ह्याच मुख्य कारण मुंबईचा पाऊस, म्हणजे एकतर चिखल त्यात कामानिम्मित कुठे बाहेर जायचं असेल तर रस्ते तुंबलेले, वाहतूक विस्कळीत झालेली असते. पण मला कोकणातला पाऊस फार आवडतो माझं गाव आहे तिथे, पाऊसात मस्त लाल मातीचे रस्ते, तो मातीचा सुगंध, हिरवीगार झाडं. खळ्यात छान बसलोय आणि समोर पाऊस पडतोय, हा नुसता संवादच मला आनंद देऊन जातो. मुंबईच्या पावसातला एक भयानक किस्सा सांगायचं झाला तर मी ११ वीत होते तेव्हा घरी जात असताना प्रचंड पाऊस वाढला मी पार्ल्यातून प्रवास करत होते. मी लोकांच्या पाऊलावर पाऊल ठेवून  तो रस्ता पार करायची कसरत सुरु केली. माझं कॉलेज सुरु होऊन एक आठवडाच झाला होता मला कळत नव्हतं की काय करू कसा तो तुंबलेले रस्ता पार करू, पाण्याचा प्रवाह लाटांसारखा येत होता.  






मी एका ताई सोबत थांबले कारण नाले उघडे होते आणि मला खूप भीती वाटत होती.  मी कशीतरी माझ्या बाबांपर्यंत पोहोचले जे तिथे एका कामानिम्मित आले होते आणि आम्ही रात्री २ वाजता कसेतरी घरी पोहचलो. पावसात  मला टपरीवरच्या काचेच्या  ग्लासातली कटिंग आणि गरमागरम बटाटा भजी आणि हिरवी चटनी खायला खूप आवडत. 'सारं काही तिच्यासाठी' चा सेट ज्या ठिकाणी आहे तिथे ही पावसाळ्यात सर्वत्र हिरवंगार होऊन जात. भले शुटिंगमुळे तितका वेळ नाही मिळत पण छान फोटो काढून मी ती मोमेन्ट एन्जॉय करते".

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.