*'फ्रेंडशिप डे'निमित्त मैत्रीच्या दुनियेतील 'दोस्ती यारी' थिरकायला पाडणार भाग*
*'दोस्ती यारी' या मैत्रीची मिसाल देणाऱ्या गाण्याला अल्पावधीतच पसंती*
*'बिग हिट मीडिया'च्या 'दोस्ती यारी' गाण्याची चर्चा, कलाकारांच्या अभिनयाने वेधलं लक्ष*
मैत्रीचं नातं हे सर्वात खास असतं. मात्र अनेकदा करिअर, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यांमुळे मैत्रीच्या नात्यात दुरावा येतो. मैत्री हे एक असे नाते आहे जे मनाने आणि इच्छेने बनते. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक वयात मित्र म्हणजे तो माणूस जो चांगल्या-वाईट काळात तुमचे विचार समजून घेतो. आता हे सारं बोलण्याचं कारण म्हणजे लवकरच फ्रेंडशिप डे येत असून हा मैत्रीचा खास दिवस प्रत्येकजण हमखास साजरा करतो. आणि हा मैत्री दिनाचा आनंद द्विगुणित करायला 'बिग हिट मीडिया' प्रस्तुत 'दोस्ती यारी' हे गाणं सज्ज झालं आहे.
चार मित्रांची कॉलेज लाईफ मधील धमाल-मस्ती, अडचणीच्यावेळी मदतीसाठीची धडपड हे सारं या गाण्यातून पाहणं रंजक ठरत आहे. अल्पावधीतच या गाण्याने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या गाण्यात विशाल फाले, आकाश जाधव, ऋषी काणेकर, शुभम खेडकर ही कलाकार मंडळी त्यांच्या मैत्रीची मिसाल देताना दिसत आहेत. हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी या गाण्याच्या निर्मितीची धुरा सांभाळत रसिकांसाठी पर्वणी आणली आहे. तर या भव्यदिव्य गाण्याच्या चित्रीकरणाला नाशिकचे माजी खासदार श्री. समीर भुजबळ यांनी कॉलेज कॅम्पस उपलब्ध करुन दिल्याने 'बिग हिट मीडिया व टीमने त्यांचे आभार मानले आहेत.
तर दिग्दर्शक स्वप्नील पाटील दिग्दर्शित हे गाणं प्रसाद शिरसाठ याने संगीतबद्ध केलं आहे. तर या सुंदर अशा गाण्याला रोहित राऊत आणि मनीष राजगिरे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याचे बोल प्रसाद शिरसाठ आणि स्मिता कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. मैत्रीची व्याख्या पटवून देणार हे गाणं साऱ्यांच्या नजरेत भरलं असून थिरकायला भाग पाडत आहे.