*अभिनेता किरण गायकवाडचे "एफ .आय .आर. नंबर 469"द्वारे सिनेदिग्दर्शनात पदार्पण*
August 11, 2024
0
*अभिनेता किरण गायकवाडचे "एफ .आय .आर. नंबर 469"द्वारे सिनेदिग्दर्शनात पदार्पण*
*श्री सिद्धिविनयकाच्या चरणी '"एफ .आय. आर. नंबर 469" चे टीजर पोस्टर लॉन्च*
*अभिनेता प्रसाद ओक, नचिकेत पूर्णपात्रे, अमृता धोंगडे प्रमुख भूमिकेत*
*अभिनेता किरण गायकवाडची नवी इनिंग*
"देवमाणूस", "लागिरं झालं जी" अशा गाजलेल्या मालिका तर "चौक", "फकाट", "डंका हरी नामचा" अशा प्रदर्शित झालेल्या व आगामी "नाद", "आंबट शौकीन" या आगामी चित्रपटांतून अभिनेता म्हणून चमकलेला अभिनेता किरण गायकवाड आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. '"एफ.आय.आर. नंबर 469" असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच श्री. सिद्धिविनायक मंदिर मुंबई येथे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे टीजर पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अगरवाल यांनी '"एफ.आय.आर. नंबर 469" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अर्चना भुतडा या सहनिर्मात्या आहेत. अभिनेता प्रसाद ओक, नचिकेत पूर्णपात्रे अभिनेत्री अमृता धोंगडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपट पहायला मिळणार आहेत.
योगेश कोळी छायांकन, विजय गावंडे संगीत दिग्दर्शन, योगेश इंगळे कला दिग्दर्शक तर अजिंक्य फाळके कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.
कसदार अभिनेता म्हणून किरण गायकवाडने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने निवडलेल्या मालिका, चित्रपटांतून त्याचा अभिनेता म्हणून असलेला कल दिसतो. त्यामुळे आता दिग्दर्शन म्हणून पदार्पण करताना त्याने चित्रपटासाठी निवडलेला विषय काय, या बाबत कुतूहल आहे. त्याशिवाय '"एफ.आय.आर. नंबर 469" या नावातून हे कथानक पोलिस तपासाचं असल्याचा अंदाज बांधता येत असला तरी विषय समजून घेण्यासाठी चित्रपटाचा ट्रेलर येईपर्यंत प्रेक्षकांना अजून थोडे थांबावं लागणार आहे.