18 ऑक्टोबर ला येतोय , " पाणी "
August 28, 2024
0
राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'पाणी' चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
तत्पूर्वी पर्पल पेबलची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा जोनस हिने चित्रपटाच्या संपूर्ण टीमची भेट घेतली. यावेळी राजश्री एंटरटेन्मेंटच्या नेहा बडजात्या, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेडचे महेश कोठारे, निर्मात्या डॉ. मधू चोप्रा, सिद्धार्थ चोप्रा, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम आणि नितीन दीक्षित उपस्थित होते.