Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आलिया भट्ट आणि शरवरी बनल्या आदित्य चोप्राच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या अल्फा गर्ल्स!

आलिया भट्ट आणि शरवरी बनल्या आदित्य चोप्राच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या अल्फा गर्ल्स!
बॉलीवूडची सुपरस्टार आलिया भट्ट आदित्य चोप्राच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड चित्रपटाचे नेतृत्व करणार आहे. सोबतच, इंडस्ट्रीची उदयोन्मुख स्टार आणि YRF ची होमग्राऊन टॅलेंट शरवरी देखील मुख्य भूमिकेत आहे. या दोघी सुपर-एजंटच्या भूमिकेत दिसणार असून, हे स्पष्ट आहे की आदित्य चोप्रा त्यांना या समूहाच्या अल्फा गर्ल्स म्हणून सादर करीत आहेत! आज YRF, आलिया आणि शरवरी यांनी या चित्रपटाचे शीर्षक समोर आणले - ‘अल्फा’ - जे एका प्रकारचे प्रखर घोषवाक्य आहे की या मुली मोठ्या पडद्यावर मोठा धमाका करणार आहेत! हे YRF चे स्पष्ट पाऊल आहे की समाजातील एक चुकीची समजूत मोडीत काढण्याचे की फक्त पुरुषच अल्फा असू शकतात! शिर्षक समोर आणणाऱ्या व्हिडिओमध्ये, आलिया भट्ट म्हणते, “ग्रीक अक्षरमालेतील पहिले अक्षर आणि आमच्या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य.. सर्वात पहिले, सर्वात वेगवान, सर्वात वीर. लक्षपूर्वक पाहा तर प्रत्येक शहरात एक जंगल आहे. आणि जंगलात नेहमीच राज्य करेल.. अल्फा!”
व्हिडिओ पाहा: https://youtu.be/8zqfxQcz7kM आदित्य चोप्रा त्यांच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड चित्रपटाला एक्शन स्पेक्टेकल बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. ‘अल्फा’ च्या दिग्दर्शनाची धुरा शिव रावलच्या हाती आहे, ज्यांनी ‘द रेल्वे मॅन’ या ब्लॉकबस्टर ग्लोबल स्ट्रीमिंग सीरिजचे दिग्दर्शन केले होते, जी देखील YRF द्वारा निर्मित होती. प्रोड्यूसर आदित्य चोप्रा यांच्याद्वारे निर्मित YRF स्पाय युनिव्हर्स आज भारतीय सिनेमा जगतातील सर्वात मोठा IP आहे. या स्पाय युनिव्हर्सच्या सर्व चित्रपटांनी - ‘एक था टायगर,’ ‘टायगर जिंदा है,’ ‘वॉर,’ ‘पठाण,’ ‘टायगर ३’ - ब्लॉकबस्टर यश मिळवले आहे. आलिया-शरवरीचा ‘अल्फा’ हा आदित्य चोप्राचा पुढील मोठा चित्रपट आहे, जे सध्या ‘वॉर २’ देखील तयार करत आहेत ज्यामध्ये हृतिक रोशन आणि NTR ज्युनियर प्रमुख भूमिकेत आहेत. या प्रसिद्ध ब्लॉकबस्टर युनिव्हर्समधील पुढील चित्रपट ‘पठाण २’ असेल, त्यानंतर ‘टायगर vs पठाण’ असेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.